डिजिटल स्ट्रेस कमी करण्यासाठी...

डिजिटल स्ट्रेस कमी करण्यासाठी...

पूर्वीच्या काळी परीक्षांमुळे, प्रेमसंबंधांमुळे, आर्थिक गोष्टींमुळे, नातेसंबंधांतील हेवेदाव्यांमुळे मनावर ताण येत असे. आज बदलत्या काळात तणावग्रस्त होण्यास डिजिटलायजेशनही कारणीभूत ठरत आहे. आज विविध गॅजेटस्‌नी जीवन व्यापून टाकले आहे. या गॅजेटस्‌ची हाताळणी करताना, त्यामध्ये साठवलेल्या डेटाची गोपनियता राखताना बरीच यातायात करावी लागते. त्यातूनही मनावर एक प्रकारचा ताण येत असतो. यावर काही उपाय...
 
बॅकअप घ्या  : आपल्या डेटाविषयी काळजी करत बसण्यापेक्षा नियमितपणाने बॅकअप घ्या. यासाठी फ्लॅश ड्राईव्ह किंवा एक्‍सटर्नल हार्डडिस्कसारखी स्टोअरेज डिव्हाईसेस आज फारच कमी किंमतीत उपलब्ध आहेत. तसेच त्यांची क्षमताही दिवसेंदिवस वाढत चालली असल्याचे दिसून येत आहे. क्‍लाऊड स्टोअरेजचाही एक उत्तम पर्याय समोर येताना दिसत आहे. ड्रॉपबॉक्‍स, गुगल ड्राईव्ह, मायक्रोसॉफ्ट वनड्राईव्ह यांसारखे अनेक पर्याय क्‍लाऊड स्टोअरेजसाठी उपलब्ध आहेत. यांवर पीडीएफ, स्प्रेडशीट्‌स, फोटोज यांसारख्या सगळ्याच फॉरमॅटमधील फाईल्स सेव्ह करता येतात. तसेच क्‍लाऊडमध्ये असल्यामुळे कधीही, कुठेही, कोणत्याही मशीनवरून ते ऍक्‍सेस करणेही शक्‍य आहे. 

ई-मेल लिस्ट करा साफ  : ईमेल उघडला की कित्येक ईमेल्स अनरीड मेल्स दिसून येतात. अशावेळी कोणता ईमेल वाचावा आणि कोणत्याकडे दुर्लक्ष करावे, हेही कळत नाही. त्यात एखादा कामाचा ईमेल मिस होण्याचीही शक्‍यता असते. अशा वेळेस इनबॉक्‍स साफ करणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी रोजच्या रोज ईनबॉक्‍स साफ करण्याची सवय आपण स्वत :ला लावून घ्यायला हवी. काही वेळा आपण चॅनेल्स सबस्क्राईब करून ठेवलेले असतात; पण प्रत्यक्षात त्यांची गरज नसते. अशा सबस्क्राईब केलेल्या चॅनेल्सना अनसबस्क्राईब केले तरी इनबॉक्‍सवरचा बराचसा ताण कमी होऊ शकेल. 

पासवर्ड मॅनेजर वापरा : इंटरनेटचा वापर वाढत आहे, तसतशी आपल्याला वेगवेगळ्या साईटस्‌वर बनवाव्या आणि वापराव्या लागणाऱ्या अकौंटस्‌ची संख्याही वाढत चाललेली आहे. अशा सर्वच अकाउंट्‌सचा पासवर्ड लक्षात ठेवणे आणि तो गोपनीय ठेवणे आवश्‍यक बनलेआहे. यासाठी चांगल्या पासवर्ड मॅनेजर ऍपची मदत घेता येईल. 

स्मार्ट प्रॉडक्‍टसचा स्मार्ट वापर  : आज इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि वेबमुळे तर अनेक कामे चुटकीसरशी करता येऊ लागली आहेत. आपल्याला उपयुक्त अशा स्मार्ट डिव्हाईसेसची निवड आणि वापर आपण स्मार्टली करणे गरजेचे आहे. किचन, हॉल किंवा अगदी बेडरूमसाठीही अशी अनेक स्मार्ट गॅजेट्‌स बाजारात उपलब्ध आहेत. एअर प्युरिफायर, होम सर्व्हियलन्स सिस्टीम, स्मार्ट ज्युसर यांसारख्या डिव्हाईसेससोबतच स्मार्ट विअरेबल्सही चांगलीच उपयुक्त ठरू शकतात. या गॅजेट्‌सच्या किंमतीही फार जास्त नाहीत. 


फोटोज क्‍युरेट करा  : डिजिटल युगामुळे आज सगळ्यांकडेच फोटोज असतात. लॅपटॉप, डेस्कटॉप, मोबाईल्स अशा सर्वच गॅजेट्‌समध्ये फोटोजचा अक्षरशः पूर आलेला असतो. अशावेळेस आपण आपले फोटो योग्य रीतीने आणि योग्य जागी सेव्ह करून ठेवणे गरजेचे आहे. तसेच वेगवेगळी फोल्डर्स बनवून ते सॉर्ट करून ठेवणेही गरजेचे आहे. ऍमेझॉन प्राईम ही सुविधा सबस्क्राईबर्सना फोटोजसाठी अनलिमिटेड स्टोअरेज उपलब्ध करून देते. व्हिडिओसाठी मात्र केवळ पाच जीबी एवढीच जागा दिली जाते. तर गुगल फोटोज सर्व युजर्सना अनलिमिटेड फोटो आणि व्हिडिओ स्टोअरेजची सुविधा देते. तुमचे सर्व फोटोज आणि व्हिडिओज तुम्ही इथे नीट सॉर्टिंग करून ठेवू शकता. नंतर ते तुम्हाला केव्हाही सहज उपलब्ध होऊ शकतील.
 
जुने तंत्रज्ञान करा रिसायकल  : जुने प्रिंटर, फोन्स, टॅब्लेट्‌स घराच्या कोपऱ्यात कुठेतरी पडून असतात. यांना काही प्रमाणात रिसायकल करणे अगदीच शक्‍य आहे. त्याचे काही इतर उपयोग करता येऊ शकतात का, हेही तपासा. कोणा गरजूलाही तुम्ही ही गॅजेट्‌स देऊ शकता. मात्र, कोणालाही आपली गॅजेट्‌स देताना त्यातील डेटा आपण डिलिट केला आहे ना, याची खात्री करून घ्यायला विसरू नका. 

या सर्वांबरोबरच सोशल मीडियावर घालवित असलेला वेळ कमी करा. तसे केल्यास तुम्हाला लोकांना प्रत्यक्षात भेटण्यास, बोलण्यास बराच वेळ मिळू शकेल. आपल्याला कोणत्या मीडियाचा किती वापर करायचा आहे, कोणता कंटेंट पाहायचा आहे, याचेही प्लॅनिंग करून ठेवा. नेटफ्लिक्‍स, टीव्ही, केबल अशा सर्वच गोष्टी एकत्रितपणे वापरण्याऐवजी त्याचे योग्य नियोजन करा. टीव्हीवरचेही अनेक कार्यक्रम तुम्हाला युट्युब किंवा चॅनेल्सच्या वेबसाईट्‌सवर कधीही सहज पाहायला मिळू शकतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com