Battlegrounds Mobile India गेममध्ये या चुका करु नका, नाहीतर...

Battlegrounds Mobile India गेममध्ये या चुका करु नका, नाहीतर...
Summary

जर युजर्संनी गेममध्ये छेडछाड करण्याचा किंवा चीटिंग टूल वापरण्याचा प्रयत्न केला, तर अशा चुकामुळे अँटी-चीटिंग सिस्टमद्वारे त्यांचे अकाउंट ओळखून बॅन केले जाऊ शकते.

पुणे: Battlegrounds Mobile India ची लोकप्रियता देशात वाढत आहे. आतापर्यंत तीन करोडहून अधिक युजर्स या गेममध्ये सहभागी झाले आहेत. या गेममध्ये, युजर्संना चांगला अनुभव येण्यासाठी नवीन शस्त्रे आणि गेम मोडचे सपोर्ट दिले गेले आहे. जर युजर्संनी गेममध्ये छेडछाड करण्याचा किंवा चीटिंग टूल वापरण्याचा प्रयत्न केला, तर अशा चुकामुळे अँटी-चीटिंग सिस्टमद्वारे त्यांचे अकाउंट ओळखून बॅन केले जाऊ शकते. आज आम्ही तुम्हाला त्या चुकांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे अकाउंट बॅन होऊ शकते. त्याबद्दल जाणून घेऊया ...

Battlegrounds Mobile India गेममध्ये या चुका करु नका, नाहीतर...
Sugar Daddy App काय आहे? Google ने केलेय बॅन, जाणून घ्या डिटेल्स

Battlegrounds Mobile India गेममध्ये चुकूनही हे काम करू नका...

- बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया गेममध्ये चीटिंग टूलचा वापर करु नका. असे केल्याने तुमचा अकाउंट बॅन होऊ शकतो.

- गेममध्ये क्लायंट फाइल डेटामध्ये छेडछाड करू नका, ते बेकायदेशीर आहे.

- गेममध्ये क्लायंट फाइल डेटा सुधारणे बेकायदेशीर आहे.

- गेम खेळण्यासाठी थर्ड पार्टी अॅप्सचा वापर करू नका.

- गेममधील बेकायदेशीर माहिती किंवा वेबसाइट्सचा प्रचार करु नका. असे केल्याने अकाउंटवर बंदी येऊ शकते.

- UC चा रिचार्ज करण्यासाठी कोणत्याही अनधिकृत पेमेंट चॅनेलचा वापर करू नका.

- तुम्ही थर्ड पार्टी अॅपद्वारे गेम व्ह्यूमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करू नका. कंपनी तुमचे अकाऊंट ब्लॉक करू शकते. तुम्ही गेम दरम्यान फक्त आपल्या स्वतःच्या स्क्रीनकडे पाहू शकता.

Battlegrounds Mobile India गेममध्ये या चुका करु नका, नाहीतर...
फेसबुक-ट्विटवर बॅन; व्यक्त होण्यासाठी ट्रम्प यांनी शोधली आयडिया

Battlegrounds Mobile India

गेम निर्माता कंपनीने गेल्या महिन्याच्या सुरुवातीला Battlegrounds Mobile India हा गेम लाँच केला. या गेमचा आकार वेगवेगळ्या उपकरणांवर अवलंबून असतो. या गेमला गुगल प्ले स्टोअरवर 4.3 अंकांची रेटिंग मिळाली आहे. बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियामध्ये, युजर्संना MG3 लाइट मशीन गन आणि Molotovsसारखे घातक ग्रेनेड तसेच एरेंजेल (Erangel) नकाशामध्ये मिशन इग्निशन (Mission Ignition) मोड सापडेल. या गेममध्ये ऑटो-ड्रॉप फीचर देण्यात आले आहे. या व्यतिरिक्त, युजर्संना इग्निशन मोडमध्ये एक विशेष बाईक मिळेल, जी जमीन आणि पाण्यावर चालण्यास सक्षम आहे.

Battlegrounds Mobile India गेममध्ये या चुका करु नका, नाहीतर...
‘Koo तुमच्या घरासारखे बाकी सगळे.. ’, ट्विटरने बॅन करताच कंगनाचे 'कू'वर जंगी स्वागत

गेल्या वर्षी, केंद्र सरकारने भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडता, भारताचे संरक्षण, राज्य सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका असल्याचे कारण देत PUBG सह 118 चीनी मोबाईल अॅप्सवर बंदी घातली होती. त्यानंतर भारतीय अॅप्सची संख्या वाढली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com