स्वप्नातही येतो सुगंध? 

The dream of the smell?
The dream of the smell?

स्वप्न न पाहणारा माणूस विरळाच. मात्र झोपेतून उठल्यावर स्वप्न आठवण्याचा प्रयत्न अनेकदा असफल ठरतो. मात्र स्वप्नात सुगंध आल्याचा काही लोकांचा दावा असतो. स्वप्नातील सुगंधासंदर्भात जगभरात संशोधन सुरू आहे. इटलीत बोलोनिया सुंगध महोत्सव भरविणाऱ्या फारुओला यांनी सांगितले, ""मी स्वप्नात नारंगी रंगाच्या फुलांचा सुगंध अनुभवला.

माझी स्वप्ने सुगंधी असतात. दररोजच्या धावपळीच्या जीवनाला सामोरे जाणाऱ्या संवेदनशील व्यक्तींमध्ये, तसेच गंध अनुभवण्याची क्षमता अधिक असणाऱ्यांना अशी स्वप्ने पडण्याची शक्‍यता असते.'' वैज्ञानिकांनीही या विषयावर बरेच संशोधन केले आहे. मात्र स्वप्नात बाहेरून येणाऱ्या सुवासावर त्यांनी लक्ष केंद्रित केले.

सुमारे 150 वर्षांपूर्वी अल्फ्रेड मोरी या फ्रान्समधील महिलेने एका शोधात स्वप्ने आत्मप्रेरित असल्याचा दावा केला होता. सिग्मंड फ्राइडनेही मोरीच्या या शोधाचा उल्लेख केला आहे. तथापि, अमेरिकेच्या ब्राऊन विद्यापीठातील मनोवैज्ञानिक आणि "द सेंट ऑफ डिझायनर' या पुस्तकाचे लेखक रेचल हर्ज स्वप्नात सुगंध येत असल्याचे संशोधन फेटाळतात. स्वप्नात लोक गंधामुळे प्रभावित होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एखादी व्यक्ती कॉफीचा गंध घेऊन झोपल्यास त्याला झोपेत हा गंध जाणवत नाही, तर झोपेतून उठल्यावर कॉफीचा वास येतो, असे उदाहरणही ते देतात. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com