चंद्रावरून कशी दिसते पृथ्वी? नील ऑर्मस्ट्राँगनंतर दुसरं पाऊल टाकणाऱ्याने शेअर केला फोटो

सूरज यादव
Saturday, 11 July 2020

नील आर्मस्ट्राँग यांच्यानंतर चंद्रावर दुसरं पाऊल टाकणाऱ्या व्यक्तीने चंद्रावरून टिपलेला पृथ्वीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली - आपल्याला पृथ्वीवरून चंद्र, सूर्य वगळता इतर ग्रह, तारे फक्त चमकताना दिसतात. नील आर्मस्ट्राँग यांच्यानंतर चंद्रावर दुसरं पाऊल टाकणाऱ्या व्यक्तीने चंद्रावरून टिपलेला पृथ्वीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अपोलो 11 मधील क्रू मेंबरपैकी एक असलेल्या बज एल्ड्रिन यांनी शेअर केला आहे. ट्विटरवर फोटो शेअर करताना त्यांनी म्हटलं आहे की,'हे दृश्य कधीच जुनं होऊ शकत नाही.' बज एल्ड्रिन हे चंद्रावर उतरणारे दुसरी व्यक्ती होते. चंद्रावर उतरलेलं सर्वात पहिलं अंतराळ यान अपोलो 11 मधून नील आर्मस्ट्राँग यांच्यासोबत बज एल्ड्रिन होते. नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं होतं. त्यानंतर क्रू मेंबर बज एल्ड्रिन चंद्रावर उतरले होते. 

अपोलो 11 मधून आणखी एक अंतराळवीर गेला होता. मायकल कॉलिन्स असं त्याचं नाव होतं. नासाने दिलेल्या माहितीनुसार बज एल्ड्रिन यांनी शेअर केलेला फोटो चंद्रावरून टिपलेला आहे. हा फोटो 20 जुलै 1969 रोजी अपोलो 11 अंतराळ यानातून टिपण्यात आला. चंद्राचा हा भाग स्मिथ समुद्राच्या जवळच्या भागात आहे. 

हे वाचा - Google, Zoom ला जमलं नाही ते Mmhmm करणार, VIDEO कॉलसाठी नवं फीचर

सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर तो तुफान व्हायरल झाला. आतापर्यंत या फोटोला 15 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केलं आहे. यावर अनेक कमेंट आल्या असून काहींनी म्हटलं की, कल्पनाच करू शकत नाही की चंद्रावरून पृथ्वी इतकी सुंदर दिसते. 

गेल्या वर्षी बज एल्ड्रिन यांनी चंद्रावरील त्यांच्या प्रवासाच्या क्षणांचे स्मरण करताना लिहिलं होतं की, त्यांचे सहकारी त्यांच्या कामात गुंतलेले होतो. मात्र ते हे दृश्य पाहून विचलित झाले. हे दृश्य किती विलोभनीय आहे. कारण पृथ्वीवर असलेले कोट्यवधी लोक दिसत नव्हते. 

एल्ड्रिन यांनी लॉस एंजलिसच्या बाहेर रोनाल्ड रीगन लायब्ररीमध्ये 50 व्या वर्धापनदिनी बोलताना सांगितलं होतं की, आम्ही चंद्रावर होतो तेव्हा वाटत होतं की पृथ्वी जवळ येत आहे. तसंच आम्हाला कधी कधी वाटायचं की आम्ही तिघेही कशातून तरी वाचलो.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: earth image click from moon by apollo 11 eldrin who was crew member