इलेक्ट्रिक टेस्ला कार भारतात का लॉन्च होत नाही? इलॉन मस्क म्हणाले...

भारतात ४०,००० डॉलर पेक्षा जास्त किमतीच्या आयात केलेल्या इलेक्ट्रिक वाहनांवर शंभर टक्के कर आकारला जातो
elon musk
elon muskelon musk

इलेक्ट्रिक कार कंपनी (Electric car) टेस्ला अनेक दिवसांपासून भारतीय बाजारपेठेत (Indian Market) प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळे ती नेहमी चर्चेत आहे. मात्र, कंपनीने आपल्या प्रयत्नात फारशी प्रगती केलेली नाही. यामुळे भारतीय ग्राहकांना वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नाही. इलॉन मस्क यांनी ट्विट करून इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च करू न शकण्याचे कारण दिले आहे. (Why isn't Tesla launched in India?)

कंपनी (Electric car) सध्या भारत सरकारसोबत अनेक आव्हानांवर काम करीत आहे, असे उत्तर इलॉन मस्क (elon musk) यांनी ट्विटरवरील एका वापरकर्त्याने त्यांना टेस्ला (Tesla) कारच्या भारतातील संभाव्य लॉन्च तारखेबद्दल विचारले असताना दिले. मात्र, त्यांनी आव्हाने कोणती आहेत आणि ते सरकारसोबत समस्यांचे निराकरण करण्याचा कसा प्रयत्न करीत आहेत हे सांगितले नाही.

elon musk
‘आम्हाला सोबत न घेतल्यास दहा जागाही मिळणे कठीण होईल’

कंपनीला भारतात टेस्ला (Tesla) लॉन्च करायची आहे. परंतु, जगातील सर्व प्रमुख देशांच्या तुलनेत भारतावर सर्वाधिक आयात शुल्क आहे. टेस्लाला भारतातील टॅरिफमधून तात्पुरती सवलत अपेक्षित आहे, असे इलॉन मस्क (elon musk) यांनी जुलै २०२० मध्ये केलेल्या ट्विटला उत्तर देताना सांगितले होते.

भारतात कर जास्त

भारतात ४०,००० डॉलर पेक्षा जास्त किमतीच्या आयात केलेल्या इलेक्ट्रिक वाहनांवर शंभर टक्के कर आकारला जातो. त्यापेक्षा कमी किमतीच्या वाहनांवर ६० टक्के कर आकारला जातो. मस्कच्या कंपनीने भारतात (Indian Market) कार लॉन्च केली तरी किमती खूप जास्त असतील आणि त्यांची विक्रीही भारतात खूप कमी होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com