व्हॉट्सअॅपची 'डिजिटल पेमेंट' सेवा भारतात सुरु

रविवार, 11 फेब्रुवारी 2018

लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपतर्फे 'डिजिटल पेमेंट'ची सेवा आता भारतात सुरु करण्यात आली आहे. या नव्या फिचरच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला पैसे पाठवणे सहज शक्य होणार आहे. सध्या काही मर्यादित युजर्सला याचे अपडेट्स देण्यात आले असले तरी येत्या काही दिवसांत सर्वांसाठी ही सेवा उपलब्ध असेल. 

नवी दिल्ली : लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपतर्फे 'डिजिटल पेमेंट' सेवा आता भारतात सुरु करण्यात आली आहे. या नव्या फिचरच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला पैसे पाठवणे सहज शक्य होणार आहे. सध्या काही मर्यादित युजर्सला याचे अपडेट्स देण्यात आले असले तरी येत्या काही दिवसांत सर्वांसाठी ही सेवा उपलब्ध असेल. 

Image may contain: one or more people and text

व्हॉट्सअॅप सातत्याने आपल्या युजर्सना नवनवे फीचर्स देते. भारतात डिजीटल पेमेंट साठी 'युनिफाइड पेमेंटस् इंटरफेस'च्या (यूपीआय) माध्यमातून पैसे पाठवता येतील असे फिचर आणणार असल्याचे काही दिवसांपुर्वी सांगण्यात आले होते. त्यानुसार ही सेवा भारतात सुरु करण्यात आली आहे. भारतात व्हॉट्सअॅप युजर्सची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सध्या हे फिचर फक्त व्हॉट्सअॅपच्या मोबाईल व्हर्जनसाठी उपलब्ध असणार आहे. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यासहीत इतर काही महत्त्वाच्या बँकांच्या माध्यमातून हे व्यवहार करता येणार आहेत.

कसे कराल व्हॉट्सअॅपद्वारे पेमेंट ?
यासाठी पैसे पाठवणारा आणि स्विकारणार या दोघांकडेही व्हॉट्सअॅपचे पेमेंट ऑप्शनचे अपडेट असणे आवश्यक आहे. तसेच ज्या युजरकडे हे फिचर आहे त्यांना सुरवातीला आपली बँक निवडावी लागणार आहे. व्हॉट्सअॅपवरील फोटो, लोकेशन पाठवतात त्या लिस्टमधून पेमेेंट ऑप्शन निवडून युपीआयच्या माध्यमातून पेमेंट करता येणार आहे. 

No automatic alt text available.

Web Title: esakal marathi news whatsapp digital payment upi