फेसबुकचा मोठा निर्णय, घेऊन येतंय पॉडकास्ट आणि लाईव्ह ऑडिओ रूम

फेसबुक आता आपल्या प्लॉटफॉर्मवर पॉडकास्ट आणि लाईव्ह ऑडिओ रुम हे फिचर्स घेऊन येत आहे.
Facebook
Facebook

फेसबुक आता आपल्या प्लॉटफॉर्मवर पॉडकास्ट आणि लाईव्ह ऑडिओ रुम हे फिचर्स घेऊन येत आहे. सोशल नेटवर्क्समध्ये ऑडिओ स्वरुपात गप्पा मारण्याची मुभा देण्यासाठी फेसबुक एक मोठे पाऊल उचलणार आहे. फेसबुक ही कंपनी या दिशेने वेगाने काम करत आहे. वापरकर्त्यांसाठी फेसबुकने नुकतेच वेगाने वाढणार्‍या ऑडिओ-आधारित अ‍ॅप क्लबहाऊसवर पॉडकास्ट आणि लाइव्ह ऑडिओ रूम्स जोडत असल्याचे सांगितले.

फेसबुक अॅपचे प्रमुख फिडजी सिमो यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगीतले की, "आम्हाला वाटते ऑडिओ फॉरमॅट प्लॅटफॉर्मवर बरेच काही घडते, तसेच ऑडिओ आणि व्हिडिओबद्दल बरेच काही करता येईल." 

आजकाल व्हॉट्सअ‍ॅप वापरुन सोशल नेटवर्क्सवरील ऑडिओ कॉल ते स्पोकन मेसेजेस करण्यापर्यंत वापरकर्त्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.सिमोच्या मते, लोकांना विनोद किंवा शॉर्ट साउंडबाईट्स पाठवण्यास परवानगी दिली जाईल. सिमो म्हणाले की आम्ही शॉर्ट फॉर्म ऑडिओचे महत्व ओळखतो. आम्हाला हे देखील माहित आहे की काही स्टोरीज आणि संभाषणे यांना सोशल मीडियावर स्थान मिळाले पाहिजे.

सध्या पॉडकास्ट केंद्रित फेसबुक पेजवरती 170 दशलक्षाहून अधिक लोक कनेक्ट आहेत. सुमारे 35 दशलक्ष वापरकर्ते पॉडकास्ट ग्रुप्सचे सदस्य आहेत.  सिमोने सांगितले की, येत्या काही महिन्यांतच आपण थेट फेसबुक अ‍ॅपवर पॉडकास्ट ऐकू शकाल. थेट किंवा अ‍ॅपच्या बॅकग्राउंडमध्ये असला तरीही हे पॉडकास्ट तुम्हाला ऐकू येईल. लाइव्ह ऑडिओ रूमची चाचणी सुरू करण्याचीही फेसबुकची योजना आहे. ही सुविधा या वर्षाच्या मध्यापर्यंत सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com