esakal | फेसबुकवर आता हाय डेफिनेशन अपलोडिंग
sakal

बोलून बातमी शोधा

फेसबुकवर आता हाय डेफिनेशन अपलोडिंग

फेसबुकवर आता हाय डेफिनेशन अपलोडिंग

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई  : सोशल मीडिया जायंट फेसबुकने अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी हाय डेफिनेशन व्हिडिओ अपलोडिंगचे फीचर देऊ केले आहे. मात्र हे फीचर लॉंच करताना कोणताही गाजावाजा न करता ऍपमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.


हाय डेफिनेशन फोटो आणि व्हिडिओ अपलोड करणे या नव्या फीचरमुळे शक्‍य होईल. पण सेटिंग्जमध्ये हे फीचर ऍक्‍टिव्ह करावे लागणार आहे. अपलोडिंगसोबतच ऑफलाइन व्हिडिओ क्‍लिप पाहण्याचेही फीचर समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच ठराविक रिझोल्युशनचे फोटो आणि व्हिडिओही अपलोड करण्याची सुविधा फेसबुकने देऊ केली आहे. सध्या हे सर्व फीचर्स फक्त अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी देण्यात आले आहेत. काही दिवसांनी आयओएसच्या वापरकर्त्यांसाठीही हे फीचर्स उपलब्ध होतील, अशी माहिती आहे.

loading image