फेसबुक नाव बदलण्याच्या तयारीत, काय आहे कारण?

mark-zuckerberg
mark-zuckerberg
Summary

कंपनीचं नाव बदलल्यास असं करणारी फेसबुक ही काही पहिलीच कंपनी नसेल.

फेसबुक आता कंपनी रिब्रँड करण्याच्या विचारात आहे. यासाठी कंपनीचे नाव बदलण्याची तयारी केली जात असल्याची चर्चा आहे. द व्हर्जने याबाबत वृत्त देताना म्हटलं की, फेसबुक पुढच्या आठवड्यात कंपनीचे नाव बदलण्याची शक्यता आहे. नाव बदलण्याबाबत कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग २८ ऑक्टोबर रोजी कंपनीच्या वर्षिक कार्यक्रमात माहिती देतील असं द व्हर्जने सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे.

सध्या फेसबुकची ओळख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अशी आहे. तर यापेक्षा वेगळी आणि अधिक अशी ओळख कंपनीची व्हावी यासाठी नाव बदलण्याची योजना असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, कंपनीच्या एका प्रवक्त्यानं यावर प्रतिक्रिया देण्यास नकार देताना म्हटलं की, अफवा किंवा चर्चेवर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देऊ शकत नाही.

अमेरिकन सरकारकडून सातत्यानं फेसबुकला चौकशीला सामोरं जावं लागत आहे. कंपनीच्या ध्येयधोरणांसह डेटा लीक प्रकरणाची चर्चाही होत असते. अमेरिकेच्या संसदेत दोन्ही पक्षांनी फेसबुकबाबत संताप व्यक्त केला होता.

mark-zuckerberg
'केंद्रीय तपास संस्थांचे काम घाबरवण्याचं नाही तर ...'

दरम्यान, फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी जुलै महिन्यात म्हटलं होतं की,'कंपनीचं भविष्य मेटाव्हर्समध्ये आहे. आपलं ध्येय मोठं असून सध्याची वाटचाल एका नव्या पर्वाच्या एका मोठ्या भागाकडे सुरु आहे.'

कंपनीचं नाव बदलल्यास असं करणारी फेसबुक ही काही पहिलीच कंपनी नसेल. २०१५ मध्ये गुगलने आपण फक्त सर्च इंजिन नसून त्यापेक्षा अधिक काही असल्याचं म्हणत बदल केले होते. स्नॅपचॅटचे रिब्रँड करत Snap Inc करण्यात आलं होते.

युरोपिय युनियनमध्ये १० हजार नोकऱ्या

दोनच दिवसांपूर्वी फेसबुकने म्हटलं होतं की, पुढच्या पाच वर्षात युरोपिय युनियनमध्ये १० हजार लोकांना नोकऱ्या देण्याची योजना आहे. यामुळे मेटाव्हर्ससाठी मदत मिळू शकेल. मेटाव्हर्स हे असं एख जग आहे जिथं लोक शेअर्ड व्हर्च्युअल स्पेसमध्ये बोलतात, संवाद साधतात. फेसबुकने व्हर्च्युअळ रिअॅलिटी आणि एआरमध्ये मोठी गुंतवणूक केली असून जवळपास तीन अब्ज युज्रसना अनेक डिव्हाइस आणि अॅपच्या माध्यमातून कनेक्ट करण्याचा त्यांचा प्लॅन आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com