esakal | व्हॉट्सअ‍ॅपवरील तुमचे खासगी मेसेज फेसबुक करतंय शेअर- रिपोर्ट
sakal

बोलून बातमी शोधा

व्हॉट्सअ‍ॅपवरील तुमचे खासगी मेसेज फेसबुक करतंय शेअर- रिपोर्ट

व्हॉट्सअ‍ॅपवरील तुमचे खासगी मेसेज फेसबुक करतंय शेअर- रिपोर्ट

sakal_logo
By
नामदेव कुंभार

व्हॉट्सअ‍ॅपचे संपूर्ण जगात २ अब्जांहून अधिक सक्रिय युजर्स असून हे सर्व एंड-टू-एंड एन्क्रिप्शनद्वारे संरक्षित आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवरील आपली माहिती अथवा चॅटिंग सुरक्षित असल्याचं Facebook ने अनेकदा सांगितले. या प्रकरणी प्रायव्हसीवर अनेकदा वादविवादही झाले. पण आता हाती आलेल्या नव्या सर्व्हेनुसार, व्हॉट्सअ‍ॅपवरील आपली माहिती खासगी राहिलेली नाही. Facebook ती माहिती इतरांसोबत शेअर करत असल्याचं समोर आलं आहे. Facebook ने मात्र हा आरोप फेटाळला आहे. प्रोपब्लिकाने ( ProPublica) मंगळवारी जाहीर केलेल्या एका अहवालानुसार, Facebook आणि WhatsApp तुमची सर्व खासगी माहिती पाहू शकतं. यासाठी जवळपास एक हजार कर्मचारी कार्यरत आहेत. ऑस्टिन, टेक्सास, डबलिन आणि सिंगापूरमधील कार्यालयात व्हॅट्सअ‍ॅपच्या लाखो सामग्रीचे संशोधन करतात. इतकेच नाही तर, कंपनीकडून खासगी डेटा कायदा अंमलबजावणी एजन्सीसोबतही शेअर केला आहे. जसे की यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिससारख्या एजन्सीसोबत डेटा शेअर केला गेलाय. फेसबुकने मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. Facebook चा संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी वारंवार सांगितले की, सर्व सुरक्षित आहे. आम्ही तुमची खासगी माहिती कुणासोबतही शेअर करत नाही. 2018 मध्ये अमेरिकन सिनेटसमोर बोलताना झुकेरबर्ग म्हणाले होते की, व्हॉट्सअ‍ॅपमधील कोणतीही सामग्री आम्हाला दिसत नाही. मात्र, ProPublica च्या अहवालानंतर पुन्हा एकदा Facebook आणि व्हॉट्सअ‍ॅपवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

डेटा चोरी होत असल्याचा अथवा तो दुसऱ्यांसोबत शेअर केल्याचा दावा फेसबुकने फेटाळला आहे. यामध्ये कोणतेही सत्य नसल्याचं फेसबुकने म्हटलेय. व्हॉट्सअ‍ॅपकडे ऑस्टिन, टेक्सास, डब्लिन आणि सिंगापूरमधील कार्यालयीन इमारतींमध्ये 1,000 हून अधिक कंत्राटी कामगार आहेत. जे लाखो वापरकर्त्यांच्या सामग्रीचे संशोधन करतात. ज्याद्वारे ते दहशतवादी हल्ले अथवा इतर धार्मिक भावना दुखल्या जातात अशा पोस्ट किंवा भडकाऊ पोस्टवर नजर ठेवून असतात. त्यासाठी खास असं अल्गोरिदम सेट करण्यात आलं आहे. त्याद्वारे दहशतवादांपासून फसवणूक, चाइल्ड पॉर्नोग्राफी आणि अश्लीलतेपर्यंत सर्व गोष्टींवर बारीक नजर ठेवली जाते. अशा एखाद्या मेसेजनंतर मिनिटभराच्या आतमध्ये फसवणूक किंवा स्पॅमचा मेसेज त्या कर्मचाऱ्यांच्या स्क्रीनवर येतो.

हेही वाचा: परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ

व्हॉट्सअ‍ॅप प्रवक्त्याने द पोस्टला दिलेल्या माहितीनुसार, “व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी एण्ड-टू-एण्ड एन्क्रिप्शनचा वापर करते. यासाठी आम्ही आमच्या युजर्सला स्पॅम अथवा गैरवर्तनाची तक्रार करण्याचा पर्यायही दिला आहे. ज्याद्वारे शेअरिंगमधील सर्वात अलीकडील संदेश समाविष्ट असतात. इंटरनेटवरील सर्वात धोकादायक आणि वाईट गैरवापर टाळण्यासाठी स्मॅपचा वापर केला जाऊ शकते. युजर्सकडून आलेल्या अशा मेसेजवरही आमचं पूर्णपणे लक्ष असतं. पण युजर्सने पाठवलेल्य काही स्पॅमशी आम्ही सहमत असेल असे नसते.

WhatsApps’s FAQ पेजनुसार, युजर्सने रिपोर्ट केलेला एखादा मेसेज, फोटो अथवा व्हिडिओ व्हॅट्सअ‍ॅप ऑटोमॅटिक स्कॅन करु शकत नाही. एखाद्या युजर्सने रिपोर्ट केल्यास आधीच्या मेसेजची खातरजमा करण्यास सांगितलं जातं. हे नियमांचं उल्लंघन आहे. प्रोपब्लिकच्या मते, संगणकाद्वारे (artificial intelligence systems ) व्हॉट्सअ‍ॅपचे संदेश एन्क्रिप्ट केलेले असतात. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरप्रमाणे सर्व चॅट्स, फोटो आणि व्हिडिओ आपोआप स्कॅन करत नाहीत."

हेही वाचा: ‘मोस्ट वाँटेड’ दहशतवादी अफगाणिस्तानचा गृहमंत्री

ProPublica च्या अहवालाला उत्तर देताना व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रवक्त्याने म्हटले की, 'आम्ही व्हॉट्सअ‍ॅप अशा प्रकारे तयार करतो ज्यामुळे आम्ही गोळा केलेला डेटा मर्यादित करता येतो. त्यामुळे स्पॅम मेसेजवर प्रतिबंधित करण्यास, धमक्यांची चौकशी करण्यास आणि गैरवर्तन करणाऱ्या युजर्सवर बंदी घालता येते. यामध्ये रिपोर्ट करणाऱ्या मेसेजचाही समावेश असतो. या कामासाठी सुरक्षा तज्ज्ञ, विश्वास आणि सिक्युरिटीच्या टीमच्या प्रयत्नांची आवश्यकता आहे. जे सर्वांचं खासगीपण जपण्यात अथक परिश्रम करतात.' प्रवक्त्याने एंड-टू-एंड एन्क्रिप्शनमधील कथित त्रुटींना थेट कमी लेखलं नाही. यावर बोलताना प्रवक्ता म्हणाले की, 'युजर्सकडून मिळालेल्या प्रतिक्रिया आणि अभिप्रायावर आम्हाला खात्री आहे. युजर्सला कोणत्या मेसेजला रिपोर्ट करायचं, याबाबत माहिती आहे. त्यानुसारच आम्ही माहिती गोळा करतो अन् त्यावर कारवाई करतो.' अहवालातील प्रोपब्लिकाच्या रिपोर्टमध्ये सत्य आढळल्यास फेसबुक आणि व्हॅट्सअ‍ॅप संकटात येऊ शकतं. काही रिपोर्ट्सनुसार, तपासादरम्यान काही गैरसमज झाले असतील. नियंत्रक फेसबुक संदेशांचे पुनरावलोकन करू शकतात, व्हॉट्सअ‍ॅप संदेशांचे नाही. परंतु, प्रोपब्लिक आपल्या दाव्यांवर ठाम आहे.

हेही वाचा: पंजशीर खोऱ्यात तालिबानच्या चौक्यांवर AIR STRIKE

2016 पासून माहिती केली जातेय शेअर?

व्हॉट्सअ‍ॅपने 2016 मध्ये जाहीर केले की ते वापरकर्त्याचा डेटा फेसबुकशी शेअर करणे सुरू करणार आहेत. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपला महसूल मिळेल. यामध्ये युजर्सचे फोन नंबर, प्रोफाईल फोटो, स्टेटस मेसेज आणि आयपी अ‍ॅड्रेस यांसारखी माहिती असेल. यामुळे फेसबुक चांगल्या मित्रांच्या सूचना देऊ शकेल आणि इतर गोष्टींबरोबरच अधिक संबंधित जाहिराती देऊ शकेल.

फेसबुकला दंड -

माहिती वितरीत केल्याप्रकरणी फेसबुक नियामकांच्या रडारवर आलं होतं. मे 2017 मध्ये युरोपियन युनियन अँटीट्रस्ट रेग्युलेटर्सने कंपनीला तब्बल 122 दशलक्ष डॉलर्सचा दंड ठोठावला होता. तीन वर्षांपूर्वी वापरकर्त्याची माहिती व्हॉट्सअ‍ॅप आणि अ‍ॅप्सच्या फेसबुक कुटुंबामध्ये जोडणे अशक्य आहे असा दावा केला. गेल्या काही दिवसांपासून फेसबुकला गोपनीयतेच्या समस्यांमुळे लक्ष केलं जात आहे. जुलै 2019 मध्ये फेडरल ट्रेड कमिशनने फेसबुकला कराराचं उल्लंघन केल्याप्रकरणी 5 अब्ज डॉलर्सचा दंड ठोठावला होता.

हेही वाचा: तालिबानकडून सरकारची घोषणा, पाहा कसं आहे मंत्रिमंडळ?

जानेवारी 2021 मध्ये व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या गोपनीयता धोरणात बदल केले होते. ज्यामध्ये पॉलिसी स्वीकारा अथव अ‍ॅपमधून बाहेर पडा, यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं. यावर अद्याप वादविवाद सुरु आहेत. व्हॉट्सअ‍ॅपचं गोपनीयता धोरण अनेकांना पटलं नाही, त्यामुळे अ‍ॅपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आपली गोपनीय माहिती शेअर होऊ शकते, यामुळे अनेकांनी स्पर्धक सिग्नल आणि टेलीग्राम अ‍ॅपला पंसती दर्शवली होती. त्यानंतर व्हॅट्सअ‍ॅपने फेब्रुवारीमध्ये युजर्सला तुमचे माहीती गोपनीय राहील असं अश्वासन दिलं.

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या एका ब्लॉगमध्ये म्हटलेय की, आमचे प्रतिस्पर्धी आम्ही युजर्सची माहिती गोपनीय ठेवतो असं म्हणून पळ काढण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहत आहोत. जर एखादे अ‍ॅप डिफॉल्टनुसार एंड-टू-एंड एन्क्रिप्शन देत नाही तर याचा अर्थ ते तुमचे संदेश वाचू शकतात. आमच्यापेक्षा माहिती कमी असल्याचा दाखला देत इतर अ‍ॅप आमच्यापेक्षा चांगलं असल्याचा दावा करत आहेत. पण आम्हाला माहितेय, युजर्स अ‍ॅप्समध्ये विश्वासार्ह आणि सुरक्षितता या दोन्हीच्या शोधत आहेत.

loading image
go to top