आता फेसबुकवरून Like होणार गायब!

वृत्तसंस्था
Friday, 27 September 2019

फेसबुकवर एखादी पोस्ट टाकल्यानंतर आपले लक्ष लागते ते Comments आणि Likes कडे. आपल्या पोस्टला Likes कमी मिळाल्याने अनेकदा आपण नाराजही होतो. मात्र, आता ही परिस्थिती येणारच नाही. कारण फेसबुकने Like चा ऑप्शन Hide करण्याचा (लपविणे) निर्णय घेतला आहे. 

नवी दिल्ली : फेसबुकवर एखादी पोस्ट टाकल्यानंतर आपले लक्ष लागते ते Comments आणि Likes कडे. आपल्या पोस्टला Likes कमी मिळाल्याने अनेकदा आपण नाराजही होतो. मात्र, आता ही परिस्थिती येणारच नाही. कारण फेसबुकने Like चा ऑप्शन Hide करण्याचा (लपविणे) निर्णय घेतला आहे. 

आता फेसबुककडून कार्यवाहीही केली जात आहे. त्यानुसार आपल्या अधिकृत यूजर्सच्या पोस्टवर Likes काउंटना Hide करणे सुरू केले असून, याचा पहिली सुरवात 27 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाच्या प्लॅटफॉर्मवर करण्यात आली आहे. त्यामुळे आता फक्त पोस्ट करणाराच Likes, Comments पाहू शकणार आहे. मात्र, इतरांना ते दिसणार नाही. त्यांना मात्र म्युच्युअल फ्रेंड्सच्या नावांसह प्रतिक्रियांचे आयकॉन दिसत राहतील.

Video : खासदार नवनीत कौर राणा यांनी धरला दांडियावर ताल...

तसेच अशाप्रकारे इतर युजर्स एकमेकांच्या पोस्टवर आलेल्या Likes आणि Comments पाहू शकणार नाहीत. त्यामुळे कमी Likes, की जास्त Likes याची स्पर्धा कमी होण्यास मदत मिळणार आहे.

मीडियाशी बोलताना, शरद पवारांनी मानले कोणाचे आभार?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facebook Is Trying To Hide Likes Count On Posts For Users To Make Fight Envy