फेक न्यूज रोखण्यासाठी फेसबुकच्या नव्या अपडेट

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

नवी दिल्ली : फेसबुकवरून पसरणाऱ्या किंवा मुद्दामहून पसरविल्या जाणाऱ्या खोट्या बातम्यांमुळे (फेक न्यूज) हिंसाचार झाल्याची काही उदाहरणे समोर आल्यानंतर आता "ट्रेंडिंग' या कॅटेगिरित सुधारणा करण्याचा निर्णय फेसबुकने घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशा खोट्या बातम्यांमुळे डोनाल्ड ट्रम्प यांना निवडणुकीत मदत मिळाल्याचेही बोलले जात आहे.

फेसबुकवरील ट्रेंडिग या सेक्‍शनमध्ये दिसणारे मुद्दे हे त्या मुद्यावर किती जणांनी चर्चा केली आहे किंवा त्या संदर्भातील मजकूर किती जणांनी शेअर केला आहे यावरून ठरत होते. त्याचप्रमाणे एखाद्या मुद्यावरील बातमीला किंवा लेखाला मिळणारे लाइक्‍स आणि शेअरही यासाठी विचारात घेतले जात होते. परंतु आकडेवारीवरून ठरविल्या जाणाऱ्या या ट्रेंडमध्ये फेरफार होण्याचे प्रकार दिसत असल्याने ही पद्धत बाद करण्यात येणार आहे.

यापुढे यूजर्सना त्यांच्या पसंतीप्रमाणे ट्रेंड्‌स पाहता येणार नाहीत. त्याऐवजी त्यांच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून त्यांच्या क्षेत्रातील ट्रेंड्‌स आणि अपडेट्‌स त्यांना दिसतील. म्हणजेच भारतात भारतातील तर अमेरिकेत अमेरिकेच्या बातम्या किंवा विषय ट्रेंडिंगमध्ये दिसतील. तसेच ट्रेंड्‌स ठरविण्यासाठी नवी पद्धत अमलात आणण्यात येईल व यामुळे खोट्या बातम्या ट्रेंड्‌समध्ये येणार नाहीत, अशी माहिती देण्यात आली आहे.

Web Title: facebook update to contain fake news