व्हाईस रेकॉर्ड करा अन् फेसबुककडून पैसे मिळवा!

वृत्तसंस्था
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

फ्रेंड लिस्टमधील नावं बोलावी लागणार

- 200 पॉइंट मिळणार 

नवी दिल्ली : सोशल मीडियापैकी एक असलेला फेसबुक अनेकांच्या प्रसंतीस उतरला आहे. त्याचा वापरही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यानंतर आता फेसबुकने व्हाईस रेकॉर्डिंगसाठी पैसे देणार असल्याचे सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा 

फेसबुकने त्यासाठी प्रोनाउंसिएशन्स (Pronunciations) प्रोग्राम लाँच केला आहे. तसेच आपली स्पीच रिकॉग्निशन टेक्नोलॉजी आणखी चांगली करण्याचा प्रयत्न करणार आहे. फेसबुकचा हा प्रोग्राम त्यांच्या व्ह्यू पॉइंट मार्केट रिसर्च ऍपवर उपलब्ध आहे. या प्रोग्रामसाठी एक चाचणी द्यावी लागणार आहे.

असे मिळवा पैसे

फेसबुकच्या व्हाईस रेकॉर्डच्या माध्यमातून पैसे मिळवण्यासाठी चाचणीत उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. त्यानंतर आता या प्रोग्राममध्ये तुमचा समावेश होईल. 

Image result for facebook

फ्रेंड लिस्टमधील नावं बोलावी लागणार

या प्रोग्राम अंतर्गत पोर्टलसोबत फेसबुकच्या फ्रेंड लिस्टमध्ये एखाद्या मित्राचे नाव बोलून दाखवून रेकॉर्ड करावे लागेल. त्यानंतर या प्रक्रियेंतर्गत आणखी 10 मित्रांचे नाव बोलून दाखवावे लागणार आहे.

200 पॉइंट मिळणार 

रेकॉर्डिंगचा सेट पूर्ण झाल्यानंतर फेसबुककडून तुम्हाला 200 पॉइंट देण्यात येणार आहे. त्यानंतर PayPal च्या माध्यमातून 360 रुपये मिळणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facebook will now pay you for your voice recording