गेमर्ससाठी खुशखबरी! २६ जानेवारीला येणार पब्जीचा देशी अवतार FAU-G

टीम ई-सकाळ
Sunday, 3 January 2021

संपूर्ण भारतात पब्जीवर बंदी घातल्यानंतर या गेमचे विकसक पब्जीची देशी आवृत्ती लाँच करण्याच्या प्रयत्नात आहेत, पण त्यांना मंत्रालयाकडून मान्यता मिळाली नाही.

FAU-G update: नवी दिल्ली : पब्जी या तुफान लोकप्रिय झालेल्या गेमचं देसी व्हर्जन फौजी बाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. फौजी या गेमचं लाँचिंग याच महिन्यात होणार असल्याने लाखो मोबाईल गेम चाहत्यांच्या आनंदाला उधाण येणार आहे. रॉयल बॅटल गेम अॅप या गेमिंग अॅप विकसक कंपनीने फौजी (FAU-G) ही गेम २६ जानेवारीला भारतात लाँच करणार असल्याचे जाहीर केले. दुसरीकडे पब्जी मोबाईल इंडियाने गेम लाँचिंगबाबत अजूनही अनिश्चितता दर्शविली आहे. 

WhatsApp Pay वरून पेमेंट करताय? मग या 5 गोष्टी जाणून घ्या​

पूर्व-नोंदणीला जोरदार प्रतिसाद  
चार महिन्यांपूर्वी अभिनेता अक्षय कुमारने फौजी (Fearless and United Guards) ही गेम भारतात लाँच करण्याबाबतची माहिती उघड केली होती. त्यानंतर नोव्हेंबर २०२० च्या शेवटच्या आठवड्यात गुगल प्लेस्टोअरवर या गेमची पूर्व-नोंदणी सुरू झाली, ज्याला बंपर रिअॅक्शन मिळाली होती. २४ तासातच लाखो मोबाईल गेम प्रेमिंनी यासाठी नोंदणी केली होती. अखेर त्यांची प्रतीक्षा संपली असून येत्या २६ जानेवारीला या बहुप्रतीक्षेत गेमचे लाँचिंग करण्यात येणार आहे. 

Image may contain: text that says "FAU-G FESSAUS FEARLESS AND UNITED GUARDS सकाळ"

जिओचं नव्या वर्षात मोठं गिफ्ट; सर्व नेटवर्कवर फ्री कॉलिंग​

कसं असेल स्वरूप 
बंगळूर येथील एनसीओआर गेम्स (nCORE Games) विकसकांनी फौजीच्या लाँचिंगची घोषणा करताना म्हटले आहे की, बहुप्रतीक्षित गेम २६ जानेवारीला लाँच केली जाईल आणि त्यानंतर अँड्रॉइड वापरकर्ते प्ले स्टोअरवरून ही गेम डाउनलोड करू शकतील. अॅपल स्टोअरवर फौजी केव्हा अपलोड केली जाईल, याबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती त्यांनी दिली नाही. 

Image may contain: 1 person, text that says "सकाळ FAU-G FEARLESS AND UNITED GUARDS"

दरम्यान, फौजी गेममध्ये भारत-चीन सीमेला लागून असलेल्या गलवान खोऱ्याची झलक पाहायला मिळणार आहे. जिथे यूजर्स स्क्वॉडचा हिस्सा बनून शत्रूंला चोख प्रत्युत्तर देतील आणि सीनेचं संरक्षण करतील. 

घरबसल्या पोर्ट करा Jio, Airtel आणि VI मध्ये आपला नंबर; जाणून घ्या प्रोसेस?​

पब्जी कधी लाँच होणार
संपूर्ण भारतात पब्जीवर बंदी घातल्यानंतर या गेमचे विकसक पब्जीची देशी आवृत्ती लाँच करण्याच्या प्रयत्नात आहेत, पण त्यांना मंत्रालयाकडून मान्यता मिळाली नाही. याबाबत  माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाने आरटीआयला उत्तर देताना सांगितले की, सध्या पबजी मोबाइल इंडिया भारतात सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली नाही.

 - सायन्स-टेक्नॉलॉजीसंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FAU G game launch date revealed New trailer gives a glimpse into first episode