'फेक न्यूज' नियंत्रित करण्यासाठी फेसबूकने उचलले मोठं पाऊल

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 6 September 2020

या फिचरचा फेक न्यूज पसरण्यावर बऱ्याच प्रमाणात बंधनं येणार आहेत. चुकीची माहिती पसरण्यापासून कमी करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे असे आहे.

नवी दिल्ली : भारतात सर्वाधिक वापरलं अ‍ॅप म्हणजे फेसबुक. हे अ‍ॅप शक्यतो सर्वांच्या मोबाईल फोनमध्ये तुम्हाला आढळेल. दुसरीकडे आपण व्हाट्सअ‍ॅप पाहिलं तर तेही खूप प्रसिध्द आहे. व्हाट्सअ‍ॅप  भारतातील जास्त वापरलं जाणारं मेसेंजर अ‍ॅप आहे. यात नेहमी काहीतरी अपडेट झाल्याचे पाहायला मिळत असते. आता व्हाट्सअपप्रमाणे फेसबुक मेसेंजरही एक नवीन फीचर आणणार आहे. या फिचरमुळे  आता आपण फेसबुक मेसेंजरवर एकावेळी पाच लोकांनाच संदेश फॉरवर्ड करू शकतो.

"पंतप्रधान मोदी एक महान नेता, भारतीय-अमेरिकी मलाच मत देतील"

दोन वर्षापुर्वी व्हाट्सअ‍ॅपने 2018 मध्ये एक फॉरवर्डवर मर्यादा असणारं फिचर आणलं होतं.  फेसबुकनेही मेसेंजरमध्ये असेच एक फिचर आणण्याची घोषणा केली आहे. या फिचरचा फेक न्यूज पसरण्यावर बऱ्याच प्रमाणात बंधनं येणार आहेत. चुकीची माहिती पसरण्यापासून कमी करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे असे आहे.  व्हाट्सअ‍ॅप वरचा हा प्रयोग  चांगलाच यशस्वी झाला आहे. व्हॉट्सअपला फॉरवर्डची मर्यादा घातल्यानंतर मेसेजमध्ये 70% ड्रॉप डाउन पाहायला मिळाले होते.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबद्दल बोलताना फेसबुकच्या अधिकृत सुत्रांनी सांगितले की,  'आम्ही फेसबुक मेसेंजरमध्ये फॉरवर्डची मर्यादा आणत आहोत. मेसेंजरवर कुटुंब आणि मित्रांसह आपण सर्वजण संपर्कात राहतो. त्यासाठी आपल्याला सगळ्यांसाठी एक सुरक्षित प्लॅटफॉर्म हवा आहे, यासाठीच आम्ही हे नवे फिचर आणत आहोत.'

काही दिवसापुर्वीची व्हॉट्सअ‍ॅप एक विषेश फिचर आणलं होतं-

व्हॉट्सअ‍ॅपने एक खास फिचर लॉंच केले होत, ज्यात संबंधित फॉरवर्ड केलेल्या मेसेजचे सत्य कळू शकते. सध्या हे फिचर भारतातील काही युसर्ससाठीच उपलब्ध केले आहे, परंतु भविष्यात हे फिचर सर्वांना वापरता येईल. व्हॉट्सअ‍ॅपचं हे फिचर सध्या अनेक देशांमध्ये वापरलं जात आहे. याठिकाणी या फिचरला प्रचंड प्रसिध्दी मिळत हे. व्हॉट्सअ‍ॅपचं हे नवीन फिचर लवकरच भारतात सर्वाना उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fecebook launched new feature in messenger like watsapp