First Lift History : जगातली पहिली लिफ्ट लोकांनी तीनच वर्षांत बंद पाडली, पण का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

First Lift History

First Lift History : जगातली पहिली लिफ्ट लोकांनी तीनच वर्षांत बंद पाडली, पण का?

लिफ्ट आज आपल्या सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहे. गगनभेदी इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांना घरापेक्षा जास्त वेळ तर लिफ्टमध्येच जातो. लिफ्ट वापरणे तर आताच्या लहान मुलांनाही लिलया जमते. पण, एक काळ असा होता जेव्हा लोक लिफ्टला घाबरत होते. लोकांच्या भितीपोटी लिफ्ट बंद करण्यात आली होती. पाहुयात नक्की प्रकार काय आहे.

पहिली प्रवासी लिफ्ट कधी सुरू झाली. ती कोणी अस्तित्वात आणली तूम्हाला माहितीय का? तर 1857 मध्ये न्यू यॉर्कमधील हाऊउट डिपार्टमेंट स्टोअरमध्ये पहिली लिफ्ट सुरू करण्यात आली होती.

पाच मजली इमारतीसाठी ती वाफेच्या इंजिनावर चालवण्यात आली होती. ही लिफ्ट फक्त ४० फूट प्रति मिनिट या वेगाने प्रवास करत होती. अशी हि लिफ्ट लोकांच्या भितीमूळे बंद करण्यात आली. लोक त्या लिफ्टमध्ये प्रवास करायला घाबरत होते. त्यांच्या मते या मशीनमधून प्रवास केला तर आपण त्यातच अडकून आपला जीव जाऊ शकतो.

तर, दुसरे कारण असे होते की, त्या वेळी लिफ्ट हे वाहतुकीचे साधन नसून पर्यटकांचे आकर्षण होते. जगात अजून उंच इमारती नव्हत्या. ज्या इमारती होत्या त्यांना जास्त मजले नसायचे.

तसेच लिफ्टच्या सुरूवातीच्या काळात लोकांना इच्छित फ्लोअरवर पोहोचवण्यासाठी भाडेही आकारण्यात येत होते. त्यामूळे लोकांनीच ती बंद केली. पण, युग बदलली आणि गगनचुंबी इमारतीच्या युगात प्रवेश करून आणि आधुनिक शहराच्या सामाजिक आणि वास्तुशास्त्रीय लँडस्केपमध्ये बदल घडवून आले.

1850 च्या दशकातील लोकांसाठी लिफ्ट ही काही नवीन कल्पना नव्हती. कारण, 1800 च्या सुरुवातीपासूनच यांत्रिकीकरण उपकरणे अस्तित्वात होती. परंतु 1850 च्या दशकाच्या उत्तरार्धात वस्तू वाहून नेण्यापासून ते लोक वाहून नेण्यापर्यंतचे बदल घडले.

पहिली लिफ्ट

पहिली लिफ्ट

ली ग्रे, यूएनसी शार्लोट येथील इतिहासाचे प्राध्यापक, एका मुलाखतीत म्हणाले होते की, "लिफ्ट बनवण्यासाठी तंत्रज्ञानामध्ये बदल होणे गरजेचे आहे. कारण सुरुवातीच्या मालवाहतूक करणार्‍यांकडे सुरक्षित लिफ्ट नव्हत्या. ते केवळ मालवाहू गोष्टींसाठी वापरले जात होते. पण, ते मानवी वाहतूकीसाठी सुरक्षित नव्हते.

यामुळे लिफ्ट बनवताना सुरक्षिततेवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले. न्यूयॉर्कमध्ये पहिले प्रवासी लिफ्ट स्थापित करणारे उद्योगपती एलिशा ओटिस यांनी न्यूयॉर्कमधील 1854 च्या जागतिक सभेत लिफ्टचे सार्वजनिक प्रात्यक्षिक दाखवले. जे सर्व अर्थाने सुरक्षित होते

लिफ्टमधील मोठे बदल

१८८९ साली लिफ्टमध्ये पुश बटण बसवण्यात आले. हा खूप महत्त्वाचा बदल होता. यानंतर लिफ्टची रचना योग्य प्रकारे करण्यात आली आणि वेग, सुरक्षेशी संबंधित मुख्य समस्या दूर करण्यात आल्या. अधिक सुरक्षित लिफ्ट बहुमजली इमारतींसाठी उपयुक्त ठरल्या. 1950 पर्यंत लिफ्ट स्वयंचलित झाली.

सध्याची आत्याधुनिक लिफ्ट

सध्याची आत्याधुनिक लिफ्ट

त्याकाळातील सर्वात जासत लिफ्ट असलेली बिल्डींग

1920 च्या दशकात, एमरी रॉथ सारख्या अवंत-गार्डे या आर्किटेक्चरनी न्यूयॉर्कमध्ये बांधकाम क्षेत्रातील क्रांती घडवली. या नवीन युगाचे प्रतीक म्हणजे एम्पायर स्टेट बिल्डिंग, जी 1931 मध्ये उघडली गेली आणि 1970 पर्यंत जगातील सर्वात उंच गगनचुंबी इमारत म्हणून पाहिली जात होती. त्यात 73 लिफ्ट होत्या, आजपर्यंतची सर्वात मोठी लिफ्ट ऑर्डर, जी प्रति मिनिट 1,200 फूट या अभूतपूर्व वेगाने प्रवास करत होती.