माशांनाही येतो भावनिक तणाव 

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

तणावजन्य परिस्थितीत शरीराचे तापमान वाढण्याचा अनुभव आपण सर्वच जण घेतो. मात्र अशा परिस्थितीत माशांच्या ही शरीराचे तापमान वाढत असल्याचा दावा एका नव्या संशोधनात केला आहे. स्पेनमधील युनिव्हर्सिटी ऑफ बार्सिलोना आणि ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ स्टर्लिंगच्या संशोधकांनी हा निष्कर्ष काढला. झेब्राफिश जातींच्या माशांच्या शरीराचे तापमान तणावजन्य परिस्थितीत दोन ते चार अंशांने वाढत असल्याचे संशोधकांना आढळले .भावनिक ताप (इमोशनल फिवर) म्हणून ओळखली जाणारी ही प्रक्रिया सस्तन प्राणी, पक्षी आणि काही सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये आढळून येते. मात्र माशांमध्ये ती प्रथमच निदर्शनास आली आहे.

तणावजन्य परिस्थितीत शरीराचे तापमान वाढण्याचा अनुभव आपण सर्वच जण घेतो. मात्र अशा परिस्थितीत माशांच्या ही शरीराचे तापमान वाढत असल्याचा दावा एका नव्या संशोधनात केला आहे. स्पेनमधील युनिव्हर्सिटी ऑफ बार्सिलोना आणि ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ स्टर्लिंगच्या संशोधकांनी हा निष्कर्ष काढला. झेब्राफिश जातींच्या माशांच्या शरीराचे तापमान तणावजन्य परिस्थितीत दोन ते चार अंशांने वाढत असल्याचे संशोधकांना आढळले .भावनिक ताप (इमोशनल फिवर) म्हणून ओळखली जाणारी ही प्रक्रिया सस्तन प्राणी, पक्षी आणि काही सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये आढळून येते. मात्र माशांमध्ये ती प्रथमच निदर्शनास आली आहे. संशोधकांनी 72 झेब्राफिशचे दोन गटांमध्ये वर्गीकरण केले. त्यानंतर या माशांना एका मोठ्या टाकीत ठेवले. टाकीत एकमेकांशी जोडलेल्या कप्प्यांमध्ये तापमानाचे 18 ते 35 अंशांच्या दरम्यान होते. पहिल्या गटातील मासे असलेल्या कप्प्यात 28 अंश तापमान ठेवले . दुसऱ्या गटातील माशांना 27 अंश तापमानाला जाळ्यामध्ये ठेवले. या वेळी जाळीच्या बाहेर येण्याच्या प्रयत्नात माशांच्या शरीराचे तापमान दोन ते चार अंशांनी वाढल्याचे लक्षात आले. संशोधिका सोनिया रे म्हणाल्या,""माशांनाही इतर प्राण्यांप्रमाणे भावनिक ताण येतो, हे आमच्या प्रयोगातून सिद्ध झाले आहे. माशांमध्ये ही  काही प्रमाणात जाणिवेची भावना असल्याचे पहिल्यांदाच सूचित झाले आहे.'' 
 

Web Title: Fish heard from the emotional tension