Flipkart Sale : आयफोनसह Poco, Realme, Vivo चे स्मार्टफोन मिळतील स्वस्तात; जाणून घ्या डिटेल्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

flipkart big saving days 2022 check deals on iphone poco realme vivo phones

Flipkart Sale : आयफोनसह Poco, Realme, Vivo चे स्मार्टफोन मिळतील स्वस्तात; जाणून घ्या डिटेल्स

Flipkart Big Saving Days 2022 : Flipkart ने 2022 च्या समाप्तीपूर्वी त्याच्या नवीन सेलची घोषणा केली आहे. Flipkart बिग सेव्हिंग डेज 2022 हा या वर्षी Flipkart वर होणारा शेवटचा सेल असणार आहे. बिग सेव्हिंग डेज सेल 2022 हा येत्या 16 डिसेंबरपासून सुरू होईल आणि 21 डिसेंबरपर्यंत चालेल. या कालावधीत, वापरकर्त्यांना स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, घरगुती उपकरणे आणि फॅशन उत्पादनांवर सूट मिळेल.

Flipkart बिग सेव्हिंग डेज 2022 मध्ये वापरकर्त्यांना Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरून खरेदीवर 5 टक्के कॅशबॅक मिळू शकतो. त्याचप्रमाणे, फ्लिपकार्ट पे लेटर सेवेचा वापर करून, निवडक उत्पादनांवर 250 रुपयांचे इंस्टंट गीफ्ट कार्ड दिले जाईल.

फ्लिपकार्टने स्मार्टफोनवर मिळणाऱ्या डिस्काउंटबद्दल तपशीलवार माहिती दिलेली नाही. पण सेलमध्ये ऑफर्स आणि डिस्काउंटसह विकल्या जाणार्‍या डिव्हाइसेसची माहिती दिली आहे. आज आपण फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेजमध्ये डिस्काउंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या काही फोनबद्दल जाणून घेणार आहोत, जे तुम्ही घेण्याचा विचार करू शकता.

हेही वाचा - संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

आयफोन 14

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज 2022 च्या बॅनरनुसार, Apple iPhone 14 वर सूट दिली जाईल. या सेलमध्ये iPhone 11, iPhone 12 सारखे जुने Apple iPhones देखील सवलतीत उपलब्ध करून दिले जातील अशी अपेक्षा आहे.

Poco M3, Realme C20

जर तुमचे बजेट 10000 रुपयांपेक्षा कमी असेल आणि तुम्हाला एक चांगला 4G स्मार्टफोन हवा असेल तर तुम्ही Poco M3 आणि Realme C20 बद्दल विचार करू शकता. Poco आणि Realme चे हे दोन्ही फोन Flipkart सेलमध्ये डिस्काउंटमध्ये उपलब्ध करून दिले जाण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा: Viral Video : समृध्दी महामार्गावर आता स्टंटबाजीही सुरू; चक्क शॉटगन घेऊन पोहचला तरूण

Poco M3 स्मार्टफोन आता फ्लिपकार्टवर 10,999 रुपयांना खरेदी करता येईल. सेलमध्ये हा फोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध केला जाऊ शकतो. त्याच वेळी, Realme 20 सध्या 7,499 रुपयांमध्ये लिस्टेड आहे आणि हँडसेट फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज 2022 मध्ये मोठ्या सवलतीसह विकला जाईल.

हेही वाचा: Bharat Jodo Yatra : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा राहुल गांधीसोबत...; फोटो शेअर करत म्हणाला…

Vivo T1 5G

Vivo T1 5G हा कंपनीचा सर्वात परवडणारा 5G स्मार्टफोन आहे. Vivo T1 5G स्मार्टफोन फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज 2022 सेलमध्ये सवलतीत उपलब्ध करून दिला जाईल. हा स्मार्टफोन सध्या 15,990 रुपयांना उपलब्ध आहे. पण Vivo चा हा फोन 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत सेलमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.