फोल्डेबल, वायरलेस, युनिर्व्हसल की-बोर्ड!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

संगणकाचा की-बोर्ड बाहेर जाताना सोबत बाळगणे अवघड जाते. ही बाब लक्षात घेऊन मायक्रोसॉफ्ट कंपनीचा वायरलेस, फोल्डेबल, युनिर्व्हसल की-बोर्ड बाजारात आणण्याचा विचार आहे. बार्सिलोनामध्ये सुरू असलेल्या "मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेसमध्ये' हा की-बोर्ड सादर करण्यात आला.

हा की-बोर्ड आयओएस, अँड्रॉइड आणि विंडोज डिव्हाइसला ब्लू ट्यूथद्वारे जोडता येणार असून, त्यामुळे टचस्क्रीन डिव्हाइसवरील टायपिंगही सुखकर होईल. हा सगळी बटणे असलेला मोठा की-बोर्ड असला, तरी तो दुमडून ठेवता येत असल्यामुळे बॅगेत किंवा खिशात घेऊन जाता येणे शक्‍य आहे. सरळ ठेवल्यानंतर त्याची जाडी पाच मिलिमीटर होते व दुमडल्यानंतर त्यातील लोहचुंबकामुळे दोन्ही भाग एकत्र राहतात.

की-बोर्ड उघडल्यावर ब्लूटूथने जोडता येणाऱ्या जवळच्या डिव्हाइसचा शोध तो घेईल. सुरवातीला फोन किंवा टॅब्लेटवरून हा की-बोर्ड जोडल्या नंतर पुढच्या वेळी वापरताना की-बोर्ड आपोआप त्या डिव्हाइसची ब्लूटूथने जोडला जाईल. विशेष म्हणजे, हा की-बोर्ड एकाच वेळी दोन डिव्हाइसला जोडता येऊ शकतो. एकदा चार्ज केल्यानंतर तो तीन महिने चालू शकतो व मायक्रो यूएसबीचा वापर करून रीचार्ज करता येतो.

Web Title: foldable keyboard microsoft