esakal | तुमचा लॅपटॉप स्लो झालाय? अशी वाढवा त्याची गती
sakal

बोलून बातमी शोधा

तुमचा लॅपटॉप स्लो झालाय? अशी वाढवा त्याची गती

तुमचा लॅपटॉप स्लो झालाय? अशी वाढवा त्याची गती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनामुळ वर्क फॉर होम करण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. कोरोनापासून आपला बचाव व्हावा आणि आपल्यासह कुटुंबीय सुरक्षित राहावे यासाठी अनेकांनी घरूनच काम करण्याला प्राध्यान दिले आहे. तसेच अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याचा सल्ला दिला आहे. अत्यावश्यक काम सोडले तर कुणालाही कंपनीत येण्यास मनाई केली आहे. यामुळे अनेकांचा कल सेकंड हँड लॅपटॉप घेण्याकडे आहे. मात्र, हे लॅपटॉप स्लो होत असल्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. (four-ways-to-clean-and-speed-up-your-laptop-windows-startup-disk-cleanup-temp-files-ram)

कोरोनामुळे शाळा बंद असल्याने घरातूनच ऑफिस व शाळा सुरू आहे. यामुळे नवीनसोबतच जुने संगणक आणि लॅपटॉपची मागणी चांगलीच वाढली आहे. मात्र, काही लोकांना कोरोनाच्या काळात नवीन लॅपटॉप घेणे शक्य नाही. त्यामुळे ते जुने लॅपटॉप घेऊन आपले काम भागवत आहे. जुने लॅपटॉप घेतल्यानंतर त्यांना नानाविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

हेही वाचा: कोरोना काळात तत्काळ पैसे हवेत? जाणून घ्या, बचत खात्यातून कसे काढायचे पैसे

बहुतेकवेळा व्हायरसमुळे लॅपटॉप असो किंवा संगणक स्लो होतो आणि सतत हँग होत असतो. यामुळे काम करताना चिडचिड वाढते. कामात सतत व्यत्थ येत असल्याने काम करण्याची इच्छा होत नाही. यामुळे सर्व राग लॅपटॉपवर काढला जातो. परंतु, आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही लॅपटॉपची गती वाढवू शकता आणि पैशांची बचतही करू शकता.

स्टार्टअप, टास्क प्रोग्राम्स करा सेट अप

लॅपटॉप सुरू केल्यानंतर एकाधी प्रोग्राम स्वतः सुरू होतो काम करीत असतो. हे प्रोग्राम्स बॅकग्राउंडवर काम करीत असतात आणि सीपीयूचा वापर करीत असतात. यामुळे आपले सिस्टम उशिरा सुरू होते. याचा लॅपटॉपच्या गतीवरही परिणाम होतो. अशा परिस्थितीत लॅपटॉपची गती वाढविण्यासाठी स्टार्टअप प्रोग्राम मर्यादित करणे आवश्यक आहे.

हेही वाचा: विदर्भात १५ जूनपर्यंत मॉन्सून धडकणार? हवामान विभागातर्फे संकेत

डिस्क क्लीनअप वापरा

लॅपटॉप चांगला चालावा यासाठी तुम्ही डिस्क क्लीनअपचा देखील वापर करू शकता. याद्वारे तुम्ही अनावश्यक स्टोरेज काढू शकता. यात रीसायकल बिन आणि डाउनलोड फोल्डर देखील आहे. ते वापरण्यासाठी विंडोज १०च्या शोध बारमध्ये डिस्क क्लीनअप टाइप करा आणि त्यास प्रविष्ट करा. यानंतर प्री इंस्टॉल ॲप दिसेल. यावर क्लिक केल्याने थोड्या वेळात फोल्डर्स स्कॅन होतील आणि हटविण्याचा पर्याय मिळेल.

तात्पुरत्या फाईल्स हटवा

व्हर्च्युअल मेमरी पूर्ण झाल्यामुळे संगणक आणि लॅपटॉप बऱ्याच वेळा स्लो का करतो. हे टाळण्यासाठी वेळोवेळी टेम्प फायली हटवा. यासाठी विंडोज १० किंवा विंडोज आर च्या शोध बारवर क्लिक करा आणि उघडलेल्या बॉक्समध्ये %temp% टाईप करा.

हेही वाचा: चंद्रशेखर बावनकुळे अचानक मौनात! राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा

रॅममध्ये करा वाढ

तुमचा लॅपटॉप किंवा संगणक स्लो झाला असेल तर त्याची रॅम वाढवून बघा. यामुळे लॅपटॉपची गती वाढण्यात मदत होईल. डेस्कटॉपमध्ये रॅम वाढविण्याचा पर्याय आहे. रॅम ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्हीकडून खरेदी करता येते.

संकलन व संपादन - नीलेश डाखोरे

(four-ways-to-clean-and-speed-up-your-laptop-windows-startup-disk-cleanup-temp-files-ram)