पेट्रोल दरवाढीला पर्याय! 'या'आहेत सर्वाधिक मायलेजच्या स्कूटी

सुझुकी अॅक्सेस १२५
सुझुकी अॅक्सेस १२५

औरंगाबाद - महागड्या पेट्रोलमुळे सर्वाधिक त्रस्त दुचाकी चालवणारे आहेत. जो-तो आता अधिक मायलेज देणाऱ्या दुचाकींचा विचार करित आहेत. बाजारात मायलेज देणाऱ्या अनेक बाईक्स आहेत. मात्र स्कूटरच्या बाबतीत वेगळा अनुभव आहे. तुम्हाला माहीत आहे, का भारतात सर्वात जास्त मायलेज देणारी स्कुटी कोणती आहे? आज आम्ही तुम्हाला ५ अशा स्कूटर्सविषयी सांगणार आहोत, जी मायलेजच्याबाबत सर्वोत्तम आणि किंमतही खूप जास्त नाही..

१. सुझुकी अॅक्सेस १२५

Suzuki Access 125 ची किंमत ७३ हजार २६७ हजार रुपये आहे. ही स्कूटी चार प्रकारात आणि सहा रंगांमध्ये उपलब्ध आहे. १२५ सीसी इंजिनसोबत ही सर्वाधिक मायलेज देणारी स्कूटी आहे. कंपनीच्या दाव्यानुसार ती एक लीटर पेट्रोलमध्ये ६४ किलोमीटरपर्यंत धावू शकते.

यमाहा फॅससिनो १२५ एफआय
यमाहा फॅससिनो १२५ एफआय

२.यमाहा फॅससिनो १२५ एफआय

- यमाहा फॅससिनो १२५ एमआयची (Yamaha Fascino 125 FI) भारतातील एक्स-शोरुम किंमत ७२ हजार ३० रुपये आहे. ती दिसायला आकर्षक आहे. त्यामुळे तरुणाईत या स्कूटरची क्रेज आहे. १२५ सीसी सेगमेंटमध्ये सर्वोत्तम मायलेजसाठी यमाहा फॅससिनो १२५ एमआय स्कूटीने स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. कंपनीनुसार ही स्कूटर एक लिटर पेट्रोलमध्ये ६३ किलोमीटर धावते.

हिरो प्लेझर प्लस
हिरो प्लेझर प्लस

३.हिरो प्लेझर प्लस

जगातील सर्वाधिक दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकाॅर्पची प्लेझर प्लस स्कूटर (Hero Pleasure Plus) एक लीटर पेट्रोलमध्ये ६३ किलोमीटर धावते. ही स्कूटर तीन प्रकारात उपलब्ध आहे. स्कूटरमध्ये ११०.९ सीसीची कॅपसिटीचे सिंगल सिलिंडर इंजिनचा प्रयोग करण्यात आला आहे. जो की ८.१ पीएसचा पाॅवर आणि ८.७ एनएमचे पीक टाॅर्क जेनरेट करते. दिल्लीत या स्कुटीची किंमत ५८ हजार ९०० रुपये आहे.

टीव्हीएस स्कूटी पेप प्लस
टीव्हीएस स्कूटी पेप प्लस

४.टीव्हीएस स्कूटी पेप प्लस

टीव्हीएसची ही स्कूटी मायलेज चांगली देतेच. पण किंमत ग्राहकांना परवडणारी आहे. टीव्हीएस स्कूटी पेप प्लसमध्ये (TVS Scooty Pep Plus) कंपनी ६५ किलोमीटर प्रतिलीटर मायलेज देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्यात ८७.८सीसीचे कॅपसिटीचे सिंगल सिलिंडरचे इंजिन आहे. जे ५.४ पीएसचे पाॅवर आणि ६.५ एनएमचे पीक टाॅर्क जेनरेट करते. भारतीय बाजारात तिची एक्स शोरुम किंमत ५६ हजार ९ रुपये इतकी आहे.

होंडा डिओ
होंडा डिओ

५.होंडा डिओ

मायलेजच्या शर्यतीत तुम्ही होंडाच्या डिओकडे (Honda Dio) दुर्लक्ष करु शकत नाही. ही स्कूटर जवळपास ५५ किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते. कंपनीने नुकतेच तिला नव्या रुपात सादर केली आहे. ११० सीसी इंजिनवाले होंडा डिओची दिल्लीत एक्स शोरुम किंमत ६३ हजार २७३ रुपये आहे. या व्यतिरिक्त होंडा अॅक्टिव्हा १०९.५ सीसीही जवळपास एक लिटर पेट्रोलमध्ये ६० किलोमीटर इतके मायलेज देते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com