ग्लासभर अधिक पाण्याने घटते वजन! 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

निरामय आरोग्यासाठी दररोज भरपूर पाणी प्यायचा सल्ला दिला जातो. आता, दररोज केवळ एक टक्का अधिक पाणी पिण्यामुळे उष्मांकाचे ज्वलन होण्यास मदत होते, त्याचप्रमाणे साखर, सोडिअम आणि कोलेस्टेरॉलच्या सेवनातही घट होते, असा निष्कर्ष अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉईसच्या संशोधकांनी काढला आहे. संशोधकांनी 
दररोज दोन ते तीन कप अधिक पाणी पिणाऱ्या 18 हजार 300 व्यक्तींवर संशोधन केले. त्यात या व्यक्तींच्या 68 ते 205 उष्मांकाचे ज्वलन झाल्याचे, तसेच त्यांचे सोडिअमचे 

सेवन 78 ते 235 ग्रॅमने व साखरेचे 5 ते 18 ग्रॅमने घटल्याचे निदर्शनास आले. या व्यक्तींच्या कोलेस्टेरॉलमध्ये ही 21 टक्‍क्‍यांपर्यंत घट झाली. या संशोधनात ब्लॅक टी, कॉफीसारख्या पाण्याचा समावेश असलेल्या पेयांचा समावेश नाही. केवळ स्वच्छ पाण्याचे प्रमाणच मोजण्यात आले. केवळ एक टक्का पाणी अधिक पिण्याने दररोजच्या उष्मांकात 
8.6 टक्‍क्‍यांनी घट होत असल्याचे ही संशोधकांना आढळले. भिन्न आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक स्तर तसेच वेगवेगळे वजन असणाऱ्या व्यक्तींमध्ये अधिक पाणी पिण्याचा सारखाच परिणाम दिसून आला. वेगवेगळी पेये पिण्यापेक्षा साधे, स्वच्छ पाणी पिण्यासाठी जागतिक पातळीवर मोहीम आखण्याची गरजही संशोधकांनी व्यक्त केली आहे.  

Web Title: full Glaas more water, decreasing the weight!