सॅमसंगची क्रेझ! 12 तासांत बुक झाले 70 हजारांहून जास्त स्मार्टफोन

galaxy s22 series
galaxy s22 series

सॅमसंगच्या लेटेस्ट Galaxy S22 सिरीज स्मार्टफोनची भारतीयांमध्ये क्रेझ वाढत आहे. या सीरिजने भारतात एक नवा विक्रम केला आहे. यावरून तिची लोकप्रियता लक्षात येते. सॅमसंग (Samsung) च्या दाव्यानुसार, कंपनीने 12 तासांपेक्षा कमी कालावधीत 70,000 पेक्षा जास्त प्री-बुकिंग झाले आहेत. भारतात Galaxy S22 सीरीजसाठी 23 फेब्रुवारीपासून प्री-बुकिंग सुरू झाले आहे.

सॅमसंग इंडिया चे सिनियर डायरेक्टर आणि हेड ऑफ प्रॉडक्ट मार्केटींग आदित्य बब्बर म्हणाले की, नवीन Galaxy S22 सीरीजला मिळालेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आम्ही आमच्या ग्राहकांचे आभारी आहोत. Galaxy S22 सीरीजच्या प्री-ऑर्डर अत्यंत उत्साहवर्धक आहेत आणि आम्ही लवकरात लवकर हे डिव्हाईस पुरविण्‍यास वचनबद्ध आहे.

मिळत आहेत 'या' खास ऑफर्स

- Galaxy S22 Ultra ची प्री-बुकिंग करणार्‍या ग्राहकांना Galaxy Watch4 ही 26999 रुपयांची स्मार्टवॉच फक्त 2999 रुपयांमध्ये मिळेल. Galaxy Watch4 सीरीज पावरफुल हेल्थ आणि वेलनेस ट्रॅकिंग फीचर्ससह येते जी वापरकर्त्यांना शरीर रचना, झोपेचे पॅटर्न, रक्त-ऑक्सिजन लेव्हल आणि पल्स ट्रॅक करण्यास मदत करेल.

त्याच वेळी, Galaxy S22 + आणि Galaxy S22 चे प्री-बुकिंग करणार्‍या ग्राहकांना 11999 रुपये किमतीचा Galaxy Buds 2 फक्त 999 रुपयांमध्ये मिळेल. Galaxy Buds 2 इमर्सिव्ह ऑडिओ एक्सपिरिएंस प्रीमियम साउंड क्वॉलिटी देते आणि अडव्हांस अॅक्टिव्ह व्हाईस कॅन्सलेशन (ANC) टेक्नोलॉजी सपोर्टसह देण्यात येत आहे,ज्यामुळे बॅग्राउंड नॉइसपासून सुटका मिळते

याशिवाय, Galaxy S आणि Galaxy Note सीरीज खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 8000 रुपयां ृचा अपग्रेड बोनस मिळेल तर इतर डिव्हाइस धारकांना 5000 रुपयांचा अपग्रेड बोनस मिळेल. जे ग्राहक सॅमसंग फायनान्स+ द्वारे ही डिव्हाईस खरेदी करण्याचा पर्याय निवडतील त्यांना 5000 रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो.

galaxy s22 series
इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीचा विचार करताय? काय आहेत बेस्ट ऑप्शन, वाचा

विक्री 11 मार्च, 2022 पासून सुरू

भारतातील ग्राहक त्यांचे Galaxy S22 Ultra, Galaxy S22+ आणि Galaxy S22 23 फेब्रुवारी ते 10 मार्च या कालावधीत प्रमुख रिटेल आउटलेट्स, सॅमसंग एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स, सॅमसंग ऑनलाइन स्टोअर आणि Amazon वर प्री-बुक करू शकतात. Galaxy S22 सीरीजची विक्री 11 मार्च 2022 पासून सुरू होईल.

फोनमध्ये काय खास आहे

Samsung ने गुरुवारी (17 फेब्रुवारी 2022) भारतात आपले तीन स्मार्ट स्मार्टफोन Samsung Galaxy S22, Galaxy S22 + आणि Galaxy S22 Ultra लाँच केले. सॅमसंगने गेल्या आठवड्यात Galaxy Unpacked 2022 इव्हेंटमध्ये Galaxy S22 सीरीज जागतिक स्तरावर लॉंच केली. गेल्या वर्षी आलेल्या Galaxy S21 मॉडेलच्या या अपग्रेड केलेल्या आवृत्त्या आहेत. Galaxy S22 Ultra, रेंजमधील सर्वात प्रीमियम मॉडेल असल्याने, Galaxy S मालिकेला Galaxy Note सारखा अनुभव देण्यासाठी इंटिग्रेटेड S-Pen सपोर्ट दिला आहे. Galaxy S22 फॅमिलीचे भारतीय व्हर्जन Qualcomm च्या Snapdragon 8 Gen 1 चिपसेटसह येतात.

galaxy s22 series
लग्नानंतर PF नॉमिनेशनमध्ये पत्नीचे नाव हवेच, अन्यथा.. जाणून घ्या नियम

भारतातील विविध व्हेरिएंटची किंमत

1. Galaxy S22 (8GB + 128GB) किंमत: 72,999 रुपये; कलर्स - फॅंटम ब्लॅक, फँटम व्हाइट, हिरवा

2. Galaxy S22 (8GB+256GB) किंमत: 76,999 रुपये; कलर्स - फॅंटम ब्लॅक, फॅंटम व्हाइट, हिरवा

3. Galaxy S22+ (8GB+128GB) किंमत: 84,999 रुपये; कलर्स - फॅंटम ब्लॅक, फँटम व्हाइट, हिरवा

4. Galaxy S22+ (8GB+256GB) किंमत: 88,999 रुपये; कलर्स - फॅंटम ब्लॅक, फॅंटम व्हाइट, हिरवा

5. Galaxy S22 Ultra (12GB+256GB) किंमत: 1,09,999 रुपये; कलर्स - बरगंडी, फॅंटम ब्लॅक, फँटम व्हाइट

6. Galaxy S22 Ultra (12GB+512GB) किंमत: 1,18,999 रुपये; कलर्स - बरगंडी, फॅंटम ब्लॅक

galaxy s22 series
कन्फर्म! या दिवशी लाँच होणार Realme Narzo 50, मिळतील जबरदस्त फीचर्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com