क्रोमवर जीमेल सपोर्ट होणार बंद

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

मुंबई - गुगलने क्रोम ब्राऊझरच्या जुन्या व्हर्जनवर वर्षाअखेरनंतर जीमेल सपोर्ट बंद होणार असल्याची घोषणा आज (बुधवार) केली. विंडोज एक्सपी आणि विस्टा या ऑपरेटिंग सिस्टिमवर जीमेल वापरणाऱ्यांवर याचा परिणाम होणार असल्याची माहिती गुगलने दिली आहे. 
 
क्रोम व्हर्जन 53 किंवा त्याहून जुने व्हर्जनचे ब्राऊझर वापरणाऱ्यांना 8 फेब्रुवारी 2017 पासून याबाबत बॅनर नोटीफीकेशन दिसेल असे गुगलने म्हटले आहे.. जुन्या ब्राऊझरमध्ये सिक्युरिटी अपडेट मिळत नसल्याने त्यांना हॅक करणे सोपे आहे, म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे गुगलने म्हटले आहे.

गुगलने दिलेल्या माहितीनुसार, बऱ्याचदा युजर्स ब्राऊझर्स अपडेट करतात. त्यामुळे अपडेटेड व्हर्जन्सवर जीमेल वापरणाऱ्यांना कोणातीही अडचण योणार नाही.

Web Title: Gmail to Stop Supporting Older Chrome Versions