गुगल मॅपने आणला क्लासिक स्नेक गेम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 एप्रिल 2019

नवी दिल्ली : सध्या मोबाईलवरच्या अनेक गेम्सची क्रेझ येत असते. परंतु, एकेकाळी मोबाईलवरचा सर्वात लोकप्रिय गेम म्हणजे 'स्नेक' गेम. आज (सोमवार) गुगल मॅप्समध्ये क्लासिक स्नेक गेमचा समावेश करण्यात आला आहे. ऍपवर हा गेम फक्त थोड्याच दिवसांसाठीच समाविष्ट करण्यात आला आहे. मॅप्स ऍपवर जाऊन हा गेम खेळता येणार आहे.

कंपनीच्या मते, हा गेम आता आयओएस आणि अँड्रॉईडसाठीही रोल आउट करण्यात आला असून पुढला एक आठवडा तो ऍपवर उपलब्ध असणार आहे. जर तुमच्याकडे ऍप नसेल तर गुगलने हा गेम खेळण्यासाठी एक स्वतंत्र साईटही तयार करण्यात आली आहे. 

कसा आहे स्नेक गेम?
ऍपच्या टॉप लेफ्ट कॉर्नरकडील मेन्यू ओपन केल्यानंतर आणि येथे मेन्यूतून स्नेक गेम सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला एक शहर (कॅरिओ, साओ पाओलो, लंडन, सिडनी, सॅन फ्रान्सिस्को, टोकियो किंवा पूर्ण जग सिलेक्ट करावे लागेल.) मग स्वाइप केल्यानंतर आपण आपली ट्रेन किंवा बस मॅपवर फिरवू शकता आणि प्रवाशांना घेऊ शकता. क्लासिक स्नेक्स गेमप्रमाणे यात कोणताही स्नेक नाही पण ही ट्रेनच प्रवाशांना घेण्यासोबतच लांबच लांब होत जाते. गेम तोपर्यंत सुरू राहतो, जोपर्यंत आपली ट्रेन किंवा बस चुकून स्वत:शीच धडक घेत नाही. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Google adds Snake game to Maps apps

टॅग्स