आता हिंदीतून बोलणार Google Assistant!

वृत्तसंस्था
Thursday, 19 September 2019

आता गुगलने आपली सर्व्हिस अपडेट केली असून, त्यानुसार गुगलकडून Google Assistant ही सर्व्हिस हिंदीतून आणली गेली आहे.

नवी दिल्ली : सर्च इंजिन म्हणून गुगल जगभरात प्रसिद्ध आहे. विविध घटना किंवा इतर माहिती घेण्यासाठी गुगलचा वापर जगभरात केला जातो. आता गुगलने आपली सर्व्हिस अपडेट केली असून, त्यानुसार गुगलकडून Google Assistant ही सर्व्हिस हिंदीतून आणली आहे.

Google For India 2019 या कार्यक्रमात कंपनीने अनेक घोषणा केल्या आहेत. यामध्ये Google Assistant हिंदी भाषेमध्ये बोलणार असल्याची माहिती गुगलकडून देण्यात आली आहे. गुगलने हिंदीसोबत मराठी, बांगला, तेलुगू, उर्दू आणि तमिळ या पाच भाषांचा समावेशही यामध्ये केला आहे.

पुण्यात कारखाली चिरडून अपंग तरुणाचा मृत्यू

Google Assistant वर Ok Google, Hindi bolo असे बोलून हिंदीमध्ये सर्च करू शकता येऊ शकते. तर Talk to me in Hindi असे उच्चारूनही हिंदीत संवाद साधता येऊ शकतो. याशिवाय जर युजर्सना हिंदी न्यूज पाहायची असले तर Ok Google, Hindi news बोला म्हणजे समोर हिंदी भाषेतील बातमी ओपन होईल.

- हे नवं फीचर व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम यांसारख्या अ‍ॅप्सवर येणारे मेसेज केवळ वाचून दाखवणार नाही तर त्यांना रिप्लायही देणार

- स्मार्टफोनमधील डिफॉल्ट मेसेज आणि गुगल हँगआऊटचे मेसेज सध्या या माध्यमातून ऐकले जातात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Google Assistant will speak in Hindi