आज २३ वर्षांचं झालं गूगल; नावाची गोष्ट माहितीय का?

google
googlegoogle
Summary

गुगलचे सुरुवातीचे नाव Backrub असं होतं. ते बदलून गूगल असं ठेवण्यात आलं. खरंतर या नावाचा इतिहास हा १९२० पर्यंत मागे जातो.

जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं सर्च इंजिन गूगल आज २३ वा वाढदिवस साजरा करत आहे. इंटरनेट वापरणाऱ्यांकडून अनेक गोष्टींची माहिती शोधण्यासाठी गूगल वापरलं जातं. गूगल सुरु करून २३ वर्षे झाल्याच्या निमित्ताने आज बर्थडेचं स्पेशल डूडल केलं आहे. गुगलच्या २३ वर्षाच्या या प्रवासाइतकीच त्याच्या नावामागची गोष्ट रंजक अशी आहे.

गुगलच्या प्रवासाची सुरुवात १९९५ मध्ये सुर झाली होती. लॅरी पेज स्टनफोर्डमध्ये ग्रॅज्युएशन करण्याच्या विचारात होते. त्यावेळी त्यांना कँम्पस दाखवण्याचं काम सर्जी बिनला देण्यात आलं होतं. जेव्हा ते पहिल्यांदा भेटले तेव्हा त्यांच्यात अनेक मतभेद होते. मात्र एक वर्षाच्या आतच त्यांनी एकत्र येत सर्च इंजिन सुरु केलं. त्यानंतर इंटरनेट क्षेत्रात अमुलाग्र अशी क्रांती झाली.

google
WhatsApp प्रायव्हसीतील त्रुटी लपवण्यासाठी जाहिरातींचा भडीमार?

गुगलचे सुरुवातीचे नाव Backrub असं होतं. ते बदलून गूगल असं ठेवण्यात आलं. खरंतर या नावाचा इतिहास हा १९२० पर्यंत मागे जातो. अमेरिकेचे गणितज्ज्ञ एडवर्ड कॅन्सर यांनी मिल्टन सिरोट्टा याला १०० शून्य असलेल्या संख्येसाठी नाव निवडण्यात मदत करण्यास सांगितलं होतं. त्यावेळी सिरोट्टाने googol हे नाव सुचवलं होतं. कॅन्सर यांनी याच शब्दाचा वापर करण्याचं ठरवलं. पुढे हा शब्द १९४० मध्ये शब्दकोशात समाविष्ट करण्यात आला. तसंच कॅन्सर यांनी लिहिलेल्या पुस्तकातही १०० शून्य असलेल्या नंबरसाठी googol शब्दाचा वापर केला.

१९९८ मध्ये जेव्हा लॅरी पेज आणि सर्जी बिन यांनी कंपनी सुरु केली. तेव्हा दोघांनीही गूगल नाव हे निश्चित केलं. दोघेही इंजिनिअर होते आणि त्यांना या शब्दाबद्दल माहिती होती. अर्थात दोघांनी Googol हा शब्द जसाच्या तसा न घेता त्यात बदल करून Google असं केलं. यामागे त्यांचा उद्देश एकच होता की जगभरातील माहिती एकाच ठिकाणी देणं. यासाठी त्यांनी १०० शून्य दाखवणारं हे नाव सर्च इंजिनला देण्याचा निर्णय़ घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com