Happy Birthday Google : जाणून घ्या, कसा झाला गूगलचा जन्म?

वृत्तसंस्था
Friday, 27 September 2019

आज आपल्या सर्वांचे भरवशाचे आणि ज्याच्याशिवाय आपले पानही हालत नाही असे सर्च इंजिन गूगलचा 21वा वाढदिवस आहे. रोज आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या गूगलचा शोध कुणी लावला हे आपल्याला माहित आहे का? 

नवी दिल्ली : आज आपल्या सर्वांचे भरवशाचे आणि ज्याच्याशिवाय आपले पानही हालत नाही असे सर्च इंजिन गूगलचा 21वा वाढदिवस आहे. रोज आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या गूगलचा शोध कुणी लावला हे आपल्याला माहित आहे का? 

1998मध्ये पीएचडी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना लार्ज स्केल सर्च इंजिन तयार करण्याची कल्पना सुचली. या दोघांची वाने म्हणजे लैरी पेज आणि सर्जी बेन. या दोघांनी सर्च इंजिनचे सर्वांत मोठे व्यासपीठ असलेल्या गूगलचा शोध लावला. गूगल अधिकृतरित्या कंपनी म्हणून उभी राहण्यापूर्वी लैरी आणि बेन या दोघांसह आणखी एक माणूसही गूगलचा शोध लावण्यात काम करत होता त्याचे नाव स्कॉट हसन. तो गूगलचा प्रमुख प्रोग्रामन होता. त्याने प्रामुख्याने गूगल सर्च इंजिनच्या कोडिंगचे काम पाहिले. मात्र, त्यानंतर तो रोबोटीक्समध्ये शिक्षण घेण्यासाठी गूगल सोडले. त्याने 2006मध्ये विलो गराज नावाची स्वत:ची कंपनी सुरु केली. 

Image result for google founders
लैरी पेज आणि सर्जी बेन

गूगलचे नाव कसे पडले?
गूगलचे आताचे इंग्लिश स्पेलिंग Google असले तरी आधी त्याचे स्पेलिंग Googol (The number followed by 100 zeros) असे होते. या अक्षरांचा आणि अकांचा उपयोग खूप मोठा आकार दर्शविण्यासाठी केला गेला. 

सध्या गूगल 100 भाषांमध्ये कार्यरत असून 2016 पर्यंत 40 देशांमध्ये गूगलचे 70 ऑफिस आहे. भारतात गूगलचे एकूण चार ऑफिस आहेत. बंगळूर, मुंबई, गुरूग्राम आणि हैदराबाद येथे ही ऑफिस आहेत. 

Google Bangalore Office
बंगळूर

Google Mumbai office
मुंबई

Google Gurgoan office
गुरूग्राम

Hyderabad Google office
हैदराबाद

गूगल या शब्दचा समावेश आता ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्येही करण्यात आला आहे. तसेच Alexa ने Google.com चा जगभरातील सर्वांत जास्त पाहिल्या जाणाऱ्या वेबसाईटमध्ये समावेश केला आहे. Alexa ही एक कर्मशियल बेल ट्रॅफिर मॉनिटरिंग कंपनी आहे.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Google celebrates it 21st Birthday