गुगल क्रोम ब्राउझरमधून वाचवता येतो इंटरनेट डाटा; जाणून घ्या महत्त्वाची फीचर्स 

google chrome browser secret features android smartphone laptop
google chrome browser secret features android smartphone laptop

नवी दिल्ली : आज माहिती तंत्रज्ञानाच्या जगात प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. अनेकांकडे कंप्युटर आहेत. यामध्ये जास्तीत जास्त गुगल क्रोमचा वापर केला जातो; परंतु वापरकर्त्या अनेकांना गुगल क्रोममधील अतिशय महत्त्वाच्या फीचर्सबद्दल माहितीच नाही. क्रोममध्ये अशी काही फीचर्स आहेत, की जी तुमचा इंटरनेट डाटा बचतीसह अनेक महत्त्वपूर्ण काम करतात. चला तर मग, जाणून घेऊया अशाच काही महत्त्वपूर्ण फीचर्सबद्दल. 

गुगल क्रोम ब्राउझरचा मार्केटमध्ये सत्तर टक्के हिस्सा आहेत. त्यावरूनच लक्षात येते, की अनेक लोक आपल्या ऍण्ड्रॉईड मोबाईलमध्ये क्रोमचाच वापर करतात. या ब्राउझरमध्ये अशी फीचर्स आहेत, ज्यामुळे तुमच्या अनेक गोष्टी सहज आणि सोप्या होतात. 

असे वाचवा तुमचे नेट 
गुगल क्रोम ब्राउझरमध्ये डाटा सेव्ह मोड देण्यात आला आहे, ज्यामुळे तुमच्या इंटरनेटची बचत होईल. याला ऍक्‍टिव्हेट करण्यासाठी प्रथम तुमचे क्रोम ब्राउझर ओपन करा. त्यानंतर उजव्या कोपऱ्यात वरती असलेल्या तीन डॉटवर क्‍लिक करा. त्यानंतर क्रोमच्या सेटिंगमध्ये जावा, तेथे तुम्हाला खाली स्क्रोल केल्यानंतर लाईट मोड दिसेल, त्यावर क्‍लिक करा. हे केल्यानंतर तुमच्या स्क्रिनवर ऑन करण्याचा पर्याय येईल. त्यावर क्‍लिक करा. तुम्ही क्रोम स्टोअरमध्ये जाऊन ब्राउझर बदलाचा वापर करू शकता. 

गुगल क्रोमचा पीडीएफ फाईल वाचण्यासाठी वापर करा 
तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये ई-बुक वाचण्यासाठी पीडीएफ रीडर डाउनलोड करावा लागतो. परंतु, क्रोमचा वापर करून पीडीएफ रीडर डाउनलोड न करताही तुम्हाला पीडीएफ फाईल वाचता येतात. त्यासाठी पीडीएफ फाईलला माऊसच्या साहाय्याने ड्रॅग करत ऍड्रेस बारपर्यंत आणा आणि सोडून द्या. त्यानंतर पीडीएफ फाईल त्यामध्ये ओपन होईल. 

क्रोमवर वापरा कॅल्क्‍युलेटर 

गुगल क्रोमवर कॅल्क्‍युलेटर आणि फाईल कन्व्हर्टचाही वापर करता येतो. त्यासाठी तुम्ही थेट सर्च बारमध्ये जावा. तेथे तुमचे न्यूमॅरिक डिजिट टाईप करा. जर तुम्हाला चार आणि नऊला जोडायचे आहे तर सर्च बारमध्ये जाऊन सरळ 4 +9 असे टाईप करा. जर तुम्हाला किलोमीटरला मीटरमध्ये बदलायचे असेल तर 4 km to m असे टाईप करा. तुम्हाला लगेच उत्तर मिळेल. 

क्रोममध्ये शोधा कम्प्युटरमध्ये सेव्ह केलेल्या फाईल 
तुमच्या कम्प्युटरमध्ये सेव्ह केलेली कोणतीही फाईल शोधायची असेल तर त्यासाठी ऍड्रेस बारमध्ये file:///C:/ टाईप करा. त्यामध्ये सी ड्राईव्हच्या जागी तुम्ही कोणत्याही ड्राईव्हला ठेवू शकता. त्यानंतर एन्टरवर क्‍लिक करा. त्यानंतर तेथील ड्राईव्ह ओपन होईल.    


संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com