
गुगलच्या Chrome मध्ये बदल झाला असून , कोणते आहेत ते अपडेट्स जाणून घ्या.
कॅलिफोर्निया : इंटरनेट ब्राउजिंगचा वापर करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. गुगलच्या क्रोम ब्राउजरचा वापर करणाऱ्यांसाठी गुगल आता क्रोमच्या नव्या अपडेटवर काम करणार आहे. हे नवीन अपडेट तुमच्या लॅपटॉपच्या बॅटरीसाठी उपयोगाचं ठरेल,कारण या नव्या अपडेटमुळे तुमच्या लॅपटॉपची बॅटरी लाइफ वाढेल असं सांगितलं जात आहे. नवीन फीचर्स अपडेट झाल्यानंतर तुमच्या लॅपटॉपची बॅटरी लाइफ दोन तासांनी वाढणार हे नक्की.
युजर्स गुगलच्या क्रोम ब्राउजरचा वापर जगातील कोट्यवधी लोक करतात. पण या क्रोम ब्राउजरमुळे बॅटरी लवकर संपते अशीही अनेकांची तक्रार असते. युजर्सची ही समस्या दूर करण्यासाठी गुगल आता एक खास फीचर आणणार आहे.
‘विंडोज क्लब’च्या रिपोर्टनुसार, क्रोमच्या नवीन अपडेटमध्ये एका खास यंत्रणेद्वारे वेबपेजच्या बॅकग्राउंड मधील ‘जावास्क्रिप्ट टाइमर’वर निर्बंध येतील. याचा थेट फायदा लॅपटॉप किंवा डिव्हाइसच्या बॅटरीला होईल आणि मग तुमची बॅटरी लाइफ वाढेल. यासाठी गुगलने एक टेस्ट घेतली होती. त्यामध्ये ३६ ‘टॅब’ बॅकग्राउंडला ओपन ठेवण्यात आल्या. त्यात ‘जावा स्क्रिप्टटाइमर’ एक मिनिटावर सेट करण्यात आला. त्यामुळेच कॉम्प्युटरला दोन तासांची अतिरिक्त बॅटरी लाइफ मिळाल्याचं नुकतेच समोर आले आहे.
हे वाचा : गुगलने हटवले 'हे' धोकादायक अॅप्स
हे वाचा : यांची हटके फॅशनेबल हेअरस्टाईल पहिली का ?
शिवाय गुगलने अजूनही काही चाचण्या बॅटरी लाइफसाठी घेतल्या आहेत. त्यामुळे आता क्रोम, विंडोज, मॅक आणि अँड्रॉइडसाठी हे नवीन फीचर उपलब्ध होईल. हे फीचर क्रोमच्या नव्या अपडेटमध्ये लवकरच उपलब्ध होईल अशी माहिती आहे. पण नवीन अपडेट कधीपर्यंत रोलआउट होईल याबाबत अद्याप कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही आहे. पण, लवकरच हे फीचर उपलब्ध होणार असं गुगल ने सांगितलं आहे.