जिओमध्ये गुगलची 33 हजार कोटींची गुंतवणूक

mukesh ambani
mukesh ambani

मुंबई - रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आज मोठी घोषणा केली असून, गुगल जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 33 हजार 737 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचं सांगितलं. जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुगलला स्ट्रॅटेजिक पार्टनर करण्यात आलं आहे. जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुगलची आता 7.7 टक्के भागिदारी असणार आहे. रिलायन्सच्या 43 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मुकेश अंबानी यांनी ही घोषणा केली. आतापर्यंत जिओमध्ये 14 कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे.

मुकेश अंबानी म्हणाले की, कोरोना हा इतिहासातील सर्वात मोठं संकट आहे. यामधून भारतासह जग लवकरच बाहेर पडण्यात यशस्वी होईल असंही त्यांनी सांगितलं. जिओमीट आतापर्यंत 50 लाख युजर्सनी डाऊनलोड केलं असल्याचंही ते म्हणाले. जिओच्या युवा टीमने नुकतंच हे तयार केलं आहे.  जिओनं 5 जी सोल्यूशन तयार केलं असून ते इतर देशांमध्ये निर्यात केलं जाईल. अंबानींनी हे तंत्रज्ञान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत या व्हिजनसाठी समर्पित केल्याचंही सांगितलं. जिओ फायबरमुळे 10 लाखांहून अधिक घरे जोडली गेली. कंपनीचे गुंतवणूकीचे टार्गेट पूर्ण झाले आहे. कंपनीने जिओ, राइट इश्यू आणि बीपीमधून 2 लाख 12 हजार 809 कोटी रुपये कमावले आहेत. 

जिओने लर्निंग अॅप इम्बाइब लाँच करण्याची घोषणा केली आहे. यामुळे बायजूसला मोठी टक्कर बसणार आहे. कोरोनाच्या काळात 200 पेक्षा अधिक शहरांमध्ये जिओमार्ट लाँच करण्यात आलं आहे. कंपनीने सांगितलं की, जिओमार्ट किराणा मालासाठी विश्वासू पर्याय म्हणून समोर आला आहे. कंपनीने ऑडिओ, व्हिडिओसाठी जिओग्लास लाँच करण्याची घोषणा केली आहे. लहान दुकानदारांच्या मदतीसाठी जिओमार्ट आणि व्हॉटसअॅप एकत्र येऊन काम करणार आहेत. 

रिलायन्स इंडस्ट्रीची पहिलीच व्हर्च्युअल वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू झाली आहे. कोरोनाच्या काळात जास्ती जास्त शेअर होल्डर या व्हर्च्युअल या सभेत भाग घेऊ शकतील यासाठी कंपनीने मोठी तयारी केली. सोमवारी रिलायन्सने एक खास व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म लाँच केला. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देश विदेशातून 500 लोकेशन्सवरून 1 लाख शेअर होल्डर्स एकाच वेळी एजीएममध्ये सहभागी होऊ शकतील.

याशिवाय रिलायन्स शेअर होल्डर्स, गुंतवणूकदार, मीडिया आणि सर्वसामान्यांच्या मदतीसाठी एक चॅट बॉटसुद्धा लाँच केलं आहे. व्हॉटसअॅप नंबर  +91 79771 11111 वर कॉल करून उत्तर मिळवू शकतात. चॅट बॉट अशा प्रकारे तयार करण्यात आलं आहे ज्यामुळे एकाच वेळी 50 हजार प्रश्नांचे उत्तर देता येईल. व्हिडिओ किंवा टेक्स्ट अशा कोणत्याही फॉरमॅटमध्ये या चॅट बॉटला प्रश्न विचारता येतात. जिओ हेप्टिकने हे चॅटबॉट तयार केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com