गुगलचे नवे फीचर, चॅटमध्ये लिंक्स, फाइल्स शोधणे होणार सोपे

Google Chat
Google ChatGoogle

जगप्रसिध्द सर्च इंजीन कंपनी गुगलने त्यांच्या Google Chat साठी नुकतेच एक नवीन फीचर आणले आहे. गुगलच्या या फीचरच्या मदतीने वापरकर्ते गुगल चॅटमध्ये त्यांनी पाठवलेला ठराविक मॅसेज किंवा लिंक फिल्टर वापरुन शोधू शकतील. या फीचरमुळे वापरकर्त्यांना त्यांचे Google Chat मध्ये मॅसेज लिंक्स आणि फाइल्स शोधणे अधिक सोपे होणार आहे.

वापरकर्ते लक्षात असलेला एखाद्या किवर्ड सर्च करुन चॅटमधील सर्व फाईल्स आणि मॅसेज पाहण्यासाठी फिल्टर वापरू शकतील. गुगलने जास्त संतुलीत सर्च रिझल्ट्ससाठी सर्चचे व्हिज्युअल इंटरफेस देखील रीफ्रेश करण्यात आहे. Google ने असेही म्हटले आहे की सर्च रिझल्ट्समध्ये आता मॅसेजचा कंटेंट देखील वापरता येईल, म्हणजे तुम्ही पाठवलेल्या मॅसेजमधील एखादा भाग जरी तुम्ही सर्च केला तरी तुम्हाला तो संपुर्ण मॅसेज शोधता येईल , या तुम्ही सोधत असलेला मॅसेड अचूकपणे सापडेल.

गूगल हे फीचर आधी Android वर उपलब्ध करेल, जे त्यानंतर iOS आणि वेब साठी जुलै 2021 च्या अखेरीस उपलब्ध करण्यात येईल . गूगल चॅटमध्ये हा सर्च फीचर सुरु केल्यास कोणत्याही प्रशासकीय नियंत्रणाची आवश्यकता नाही. तसेच, या वैशिष्ट्यासाठी कोणतीही अंतिम वापरकर्ता सेटिंग असेल. या फीचरसाठी कोणत्याही अॅडमीन कंट्रोलची आवश्यकता राहाणार नाही. तसेच, या फीचरसाठी वापरकर्त्यांना कोणतीही सेटिंग करावी लागणार नाही.

Google Chat
ब्रॉडबँड घ्या 600 रुपये वाचवा; BSNL ची खास याेजना

मोबाईलवर गुगल चॅटमध्ये सर्च करत असताना तुम्ही सर्च बॉक्सच्या खाली असलेल्या सर्च फिल्टर चिप्सचा वापर करून तुम्ही अचूक मॅसेज शोधू शकता असे गुगलकडून सांगण्यात आले आहे. गुगलते हे फीचर Google Workplace वापरकर्त्यांसाठी आणि वैयक्तिक खात्यांसाठी उपलब्ध असेल

Google ने अलीकडेच घोषणा केली आहे की मॅसेज अॅपद्वारे पाठविलेले आरसीएस चॅट आता एंड-टू-एंड एनक्रिप्टेड केले जाईल. कंपनीने मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये बीटामध्ये हे फीचर आणले होते आणि आता ते सर्व वापरकर्त्यांसाठी देण्यात येत आहे. कंपनीचा असा दावा आहे की मॅसेजमधील एंड टू एंड एन्क्रिप्शन ते पाठवताना आपले संभाषण अधिक सुरक्षित ठेवेल.

Google Chat
ब्लूटूथने नियंत्रित होणारी Yamaha FZ-X बाजारात दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com