Google New Tool : व्हायरल फोटोची सतत्या पडताळणार गुगल, Launch केलं नवं कोरं फिचर! | Google New Tool :New tool google image search identify fake ai photos | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Google New Tool

Google New Tool : व्हायरल फोटोची सतत्या पडताळणार गुगल, Launch केलं नवं कोरं फिचर!

Google New Tool : कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्याचे मेसेज शनिवारी व्हॉटस् अ‍ॅप जोरात फिरत होते. अनेकांनी त्याची पडताळणी न करताच मुंढे यांच्या फोटोखाली अभिनंदन असे लिहून पुन्हा मेसेज व्हायरल केले. त्यामुळे मुंढे यांच्या नियुक्तीची अफवा मोठ्या प्रमाणात पसरली होती. परंतू मुंढे यांची कोल्हापूरला नाही तर शासनाच्या मराठी भाषा सचिवपदी नियुक्ती झाली आहे.

व्हायरल होणाऱ्या अशा फोटोजमुळे अनेक गोष्टी खऱ्या समजल्या जातात. इंटरनेटच्या या युगात ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण खूप वाढले आहे. ही फसवणूक करण्यासाठी अनेकदा Edited Photo, Video चा वापर केला जातो.

अशा तऱ्हेने फेक इमेज ओळखण्यासाठी सर्च इंजिन गुगलकडून एक नवीन फॅक्ट चेक मार्कर जोडण्यात आले आहे, जे गुगल सर्च रिझल्टसह इमेजसोबत दिसेल. दिशाभूल करणारे फोटो आणि व्हिडिओ ओळखण्यासाठी गुगलने इमेज सर्च टूल लाँच केले आहे.

हे टूल फेक फोटो ओळखून त्यांना लेबल करेल. हे लेबल प्रतिमा आणि व्हिडिओच्या वेब पृष्ठाच्या खाली दिसेल. या फॅक्ट चेकमुळे केवळ इमेजच नाही तर एखाद्या आर्टिकल इमेजची फॅक्ट चेकही तपासली जाईल. फॅक्ट चेक करा, तुम्हाला इमेजच्या सोर्समधून संपूर्ण माहिती मिळेल.

गुगलच्या या टूलचा मोठा उपयोग होणार आहे. 2022 च्या पॉयंटरच्या अहवालानुसार, इंटरनेट जगातील 62 टक्के लोक दररोज किंवा आठवड्यातून एकदा चुकीच्या माहितीच्या संपर्कात येतात. गुगलच्या या टूलचा मोठा उपयोग होणार आहे.

2022 च्या एका अहवालानुसार, इंटरनेट जगातील 62 टक्के लोक दररोज किंवा आठवड्यातून एकदा चुकीच्या माहितीच्या संपर्कात येतात. गुगलने ब्लॉगमध्ये या फिचरची माहिती दिली आहे.

कॅलिफोर्नियास्थित द माउंटन व्ह्यू ही कंपनी अनेक वर्षांपासून मुख्य शोध परिणामांमध्ये या फॅक्ट चेक लेबलचा वापर करत आहे. व्हिडिओ स्ट्रीमिंग साइट यूट्यूबच्या सर्च रिझल्टमध्येही याचा वापर करण्यात आला आहे. गुगलने सांगितले की, या सर्च रिझल्ट दररोज 11 दशलक्षाहून अधिक वेळा फॅक्ट चेक केले जातात.

गुगलचे प्रॉडक्ट मॅनेजर हॅरिस कोहेन यांनी सांगितले की, फोटो आणि व्हिडिओ हा जगभरातील माहितीचा महत्त्वाचा स्त्रोत आहे. पण चुकीच्या व्हिज्युअल्समुळे लोकांना आता खूप त्रास सहन करावा लागत आहे. फोटोच्या सत्यतेवर, विशेषत: प्रतिमेच्या उत्पत्तीबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या समस्येवर मात करण्यासाठी गुगलसह फेसबुक आणि ट्विटरसारख्या दिग्गज पुढे येत आहेत.

या टूलच्या मदतीने गुगल इमेज सर्च इंटरनेटवरील कोणत्याही प्रकारचे फेक एआय फोटो ओळखेल. याचा फायदा असा होईल की कोणताही फोटो डाऊनलोड आणि शेअर करण्यापूर्वी तो फोटो खरा आहे की एआयने बनवलेला आहे हे तुम्हाला कळेल. याशिवाय गुगलने असेही म्हटले आहे की, कोणत्या टूलच्या मदतीने ते आपल्या प्लॅटफॉर्मवर सर्व फोटो चिन्हांकित करतील.  

या चिन्हामुळे निर्मातेही आपल्या बातम्यांमधील प्रतिमा वापरण्यासाठी या चिन्हांचा क्रेडिट म्हणून वापर करू शकतील. गुगल आपला इमेज सर्च सुधारण्यासाठी मिडजर्नी आणि शटरस्टॉकसोबत काम करत आहे.