Google Photosच्या मदतीने बनवा स्पेशल फोटो मूव्ही, जाणून घ्या सविस्तर

आता आपण Google फोटोमध्ये ऑटोमॅटीक थीम बेस व्हिडीओ क्लीप तयार करू शकता.
google photos
google photos Google

तुमच्या फोनमध्ये असलेले फोटो वापरुन आपण बर्‍याचदा विशेष व्हिडीओ शॉर्ट क्लिप तयार करतो, जेणेकरून ती क्लीप आपल्याला इतरांसोबत शेयर करता येईल. परंतु आता आपण Google फोटोमध्ये ऑटोमॅटीक थीम बेस व्हिडीओ क्लीप तयार करू शकता. हे फीचर गूगल फोटो (Google Photos) अ‍ॅप मध्ये देण्यात आले आहे ज्या बद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. (google photos offers to create themed movies Marathi Article)

गुगल फोटो प्रत्येक अँड्रॉइड स्मार्टफोनवर प्रीलोड केलेले अॅप आहे आणि आयओएस डिव्हाइसवर इन्स्टॉल करावे लागेल. गूगल फोटो एक लोकप्रिय फोटो अ‍ॅप असून ते फोटो स्टोर करण्याची सुविधा देते. हे एआय फंक्शन (AI Function) आहे ज्यामुळे ते ऑटोमॅटीक होते. मात्र आपल्याला व्हिडिओ आवडला नाही तर आपण तो एडीट आणि कस्टमाइज देखील करू शकता.

गूगल फोटोंच्या या फीचरसाठी आपल्याला एक थीम निवडावी लागेल, त्यानंतर थीम आपोआप काम सुरु करेल आणि आपल्यासाठी एक बेस्ट व्हिडीओ बनवेल, ज्यास आपण कस्टमाइज देखील करू शकता.

google photos
आता तुमच्या भाषेत पाठवा मेसेज; Koo app नं लाँच केलं 'Talk to Type' फिचर

थीम असलेली Google फोटो मूव्ही (व्हिडीओ) कसे तयार करावा

  • यासाठी पहिल्यांदा फोनवर गूगल फोटो अ‍ॅप उघडा.

  • खाली दिलेल्या लायब्ररी ऑप्शनवर क्लिक करा.

  • यानंतर स्क्रीनवर वरील utilities या पर्यायावर क्लिक करा.

  • स्क्रीनवर एक नवीन स्क्रीन उघडेल, ज्यामध्ये व्हिडीओचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

  • स्क्रीनवर एक नवीन स्क्रीन उघडेल ज्यामध्ये सर्वात वर न्यू हा ऑप्शन दिलेल त्यानंतर मेओ मूव्ही, डॉगी मूव्ही आणि सेल्फी मूव्हीसारख्या पर्याय दिलेले असतील .

  • हे लक्षात ठेवा की आपण निवडलेला पर्याय संबंधी Google फोटो सर्व्हरकडे अधिक फोटो असावेत. अन्याथा गुगल फोटो मूव्ही बनवणार नाही.

फोटो मूव्ही एडीट कशी करावी

आपण Google फोटोद्वारे ऑटोमॅटीक तयार केलेला व्हिडीओ एडीट करायचा असल्यास एडीटचा पर्याय प्ले दरम्यान दिसून येईल. यासह आपण साउंड ट्रॅक, फोटो आणि फोटोंचा क्रम देखील बदलू शकता.

google photos
‘ऑक्सिजन ऑन व्हील्स’ सज्ज; जलद गतीने होणार ऑक्सिजन सिलेंडर्सची वाहतूक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com