Google Pixel 7a: लॉंच होण्यापूर्वीच समोर आली गुगलच्या परवडणाऱ्या फोनची माहिती, काय असेल खास? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

google pixel 7a launch soon with 90hz display flagship camera wireless charging report

Google Pixel 7a: लॉंच होण्यापूर्वीच समोर आली गुगलच्या परवडणाऱ्या फोनची माहिती, काय असेल खास?

गुगलने अलीकडेच आपल्या फ्लॅगशिप पिक्सेल सीरिज अंतर्गत दोन नवीन स्मार्टफोन पिक्सेल 7 आणि पिक्सेल 7 प्रो भारतात लॉन्च केले आहेत. आता गुगल परवडणाऱ्या ए-सिरीजचा विस्तार करणार आहे. Google Pixel 7a जानेवारीमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे.

या दरम्यान हा फोन लॉन्च होण्यापूर्वीच फोनच्या स्पेसिफिकेशन आणि कॅमेरा सेटअपची माहिती समोर आली आहे. लीक्सनुसार, फोन फ्लॅगशिप कॅमेरा सेन्सरसह ऑफर केला जाईल. यासोबतच फोनमध्ये वायरलेस चार्जिंगचा सपोर्टही मिळेल. मात्र, अद्याप या फोनबाबत गुगलकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. चला जाणून घेऊया फोनमध्ये कोणते फीचर्स असणार आहेत.

Google Pixel 6a अपग्रेडेशन टप्प्यात होणार लॉन्च

Android च्या ओपन-सोर्स कोडच्या पब्लिक कन्वर्सेशनने कंन्फर्म केले आहे की Google नवीन Pixel 7a स्मार्टफोनवर काम करत आहे आणि हा फोन 2023 च्या सुरुवातीला लॉन्च केला जाऊ शकतो. या डिव्हाइसचे कोडनेम Lynx देखील लीक्समध्ये दिसून आले आहे. Google Pixel 7a हा Google Pixel 6a च्या अपग्रेडवर सादर केला जाईल. कंपनीने याच वर्षी ऑगस्टमध्ये मिड-रेंज स्मार्टफोन Google Pixel 6a लॉन्च केला होता.

हेही वाचा: iPhone SE येतोय नव्या अवतारात; कधी लाँच होणार अन् काय असेल खास? जाणून घ्या

Google Pixel 7a चे स्पेसिफिकेशन्स

लीक्सनुसार, Google Pixel 7a 90Hz डिस्प्ले पॅनेलसह ऑफर केला जाईल. त्याचबरोबर फोनसोबत टेन्सर जी2 प्रोसेसर सपोर्ट असेल. फोनसोबत वाय-फाय आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसाठीही क्वालकॉम प्रोसेसर वापरला जाऊ शकतो. असे झाल्यास, कनेक्टिव्हिटीसाठी Google च्या टेन्सर प्रोसेसर वॉल फोनला क्वालकॉम चिप्ससह एकत्रित करण्याची ही पहिलीच वेळ असेल.

हेही वाचा: Honda EM1 e: शाळा-कॉलेजात जाण्यासाठी होंडाची परफेक्ट इलेक्ट्रिक स्कूटर, काय आहे खास वाचा

Google Pixel 7a - कॅमेरा

Google Pixel 7a च्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, सॅमसंगचा फ्लॅगशिप 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर यामध्ये आढळू शकतो. त्याच वेळी, फोन 64-मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स आणि 13-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सरने सुसज्ज असू शकतो. Google Pixel 7 सह टेलीफोटो लेन्स उपलब्ध नाही, गुगलने फक्त प्रो लेव्हल फोनवरच टेलीफोटो लेन्सला सपोर्ट केले आहे. Google Pixel 7a सह 5W चार्जिंग सपोर्ट उपलब्ध असेल. फोनमध्ये वायरलेस चार्जिंगसाठी P9222 चिपसेटसाठी सपोर्ट देखील मिळू शकतो.

टॅग्स :Google