लवकरच येतोय Google Pixel 7a; कमी किमतीत मिळणार फ्लॅगशिप कॅमेरा अन् दमदार फीचर्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

google pixel 7a

लवकरच येतोय Google Pixel 7a; कमी किमतीत मिळणार फ्लॅगशिप कॅमेरा अन् दमदार फीचर्स

टेक कंपनी Google ची ए-सीरीज परवडणाऱ्या किंमतीत येते आणि पिक्सेल सीरीजचे फीचर्स कमी किंमतीत ऑफर करते आणि आता नवीन Google Pixel 7a शी संबंधित काही माहिती समोर आली आहे.कंपनी आपल्या Pixel 7 सीरीजचा हा फोन 2023 मध्ये लॉन्च करेल आणि तो मोठ्या अपग्रेडसह लॉन्च केला जाईल. तसेच Pixel 7a मध्ये फ्लॅगशिप कॅमेरा सेन्सर्स व्यतिरिक्त, वायरलेस चार्जिंग सारखे अपग्रेड मिळतील असे सांगितले जात आहे .

Google ने त्यांची A-सीरीज डिव्हाइसेस स्टँडर्ड फ्लॅगशिप फोनची डाउनग्रेड केलेली आणि परवडणारी आवृत्ती म्हणून बाजारात आणली होती. माज्ञ, गेल्या काही वर्षांत, हे स्वस्त मॉडेल फ्लॅगशिप फीचरसह लॉन्च केला आहे आणि कंपनी क्वालिटी किंवा एक्सपिरीएंसशी तडजोड करत नाही.असाच बदल कंपनीच्या पुढील परवडणाऱ्या मॉडेलमध्येही पाहायला मिळणार असून तो भारतीय बाजारपेठेतही लॉन्च केला जाऊ शकतो.

हेही वाचा: Flipkart वरून खरेदी करणं महागलं! आता 'कॅश ऑन डिलिव्हरी'साठी द्यावे लागणार अतिरिक्त पैसे

Android च्या ओपन-सोर्स कोडबद्दलच्या पब्लिक कन्वर्सेशनमध्ये हे कंन्फर्म झाले आहे की Google नवीन Pixel 7a स्मार्टफोनवर काम करत आहे. या डिव्हाइसचे कोडनेम 'Lynx' लीकमध्ये समोर आले आहे आणि अशी माहिती समोर आली आहे की हा स्मार्टफोन पुढील वर्षी 2023 मध्ये ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च केला जाईल. लीकर डिजिटल चॅट स्टेशनने पूर्वी सूचित केले होते की Pixel 7a, जो चीनमधील फॉर्सकॉन फॅसिलीटी मध्ये तयार केला जात आहे, त्याला Pixel 7 सीरीजप्रमाणे Tensor G2 चिपसेट दिला जाईल.

हेही वाचा: Nokia G60 5G: लवकरच भारतात येतोय Nokia चा 5G फोन, कमी किंमतीत मिळतील दमदार फीचर्स

9to5Googleच्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की Pixel 7 सीरीजप्रमाणे, Pixel 7a देखील सिरेमिक बॉडीसह येऊ शकतो, असे झाल्यास, Pixel 7a हे सिरेमिक बॉडीसह येणारा पहिले Pixel A-सिरीजचे डिव्हाइस असू शकतो. एका अँड्रॉइड रिसर्चरने नवीन डिव्हाइसमध्ये वायरलेस चार्जिंगसाठी 'P9222' चिप मिळवण्याबाबतही संकेत दिले आहेत. तथापि, या चिपसह जास्तीत जास्त 5W चार्जिंग मिळू शकते, याचा अर्थ नवीन फीचर्सचा फारसा उपयोग होणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार Google Pixel 6 सिरीजमध्ये आढळणारा फ्लॅगशिप Samsung चा 50MP प्रायमरी सेन्सर Pixel 7a मध्ये दिला जाईल. याशिवाय फोनमध्ये 64MP टेलिफोटो सेन्सर आणि 13MP मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर दिला जाईल. ए-सीरीज डिव्हाइसला टेलिफोटो सेन्सर मिळण्याची ही पहिलीच वेळ असेल. मात्र, कंपनीने या फोनबाबत अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही.

टॅग्स :Google