लवकरच डेस्कटॉपवर मिळणार Google Lens सपोर्ट, टेस्टिंग सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

google lens

लवकरच डेस्कटॉपवर मिळणार Google Lens सपोर्ट, टेस्टिंग सुरु

आतापर्यंत तुम्ही फक्त Android आणि iOS फोनमध्येच Google Lens वापरु शकत होतात, परंतु लवकरच त्याचा सपोर्ट डेस्कटॉपवरही मिळणार आहे. गुगल लेन्सचा आयकॉन नुकताच google.com वर दिसला. एका रिपोर्टनुसार, एका यूजरने Google Chrome च्या Incognito मोडमध्ये Google Lens आयकॉन पाहिला असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

डेस्कटॉपवर गुगल लेन्सचा सपोर्ट मिळाल्यानंतर, तुम्ही फोटोमधून मजकूर कॉपी करू शकाल आणि डेस्कटॉपवरूनच इमेज शोधू शकाल. सध्या, Google Chrome डेस्कटॉपवरील फोटोवर राईट क्लिक केल्यावर Google Lens वापरुव इमेज शोधण्याचा पर्याय मिळतो.

9to5Google च्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, Google डेस्कटॉपसाठी लेन्सची टेस्टिंग देखील करत आहे. क्रोम 92 अपडेटसह त्याचा सपोर्ट मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी Google लेन्स आधीपासूनच Google सर्चमध्ये सपोर्ट मिळत आहे. Google Photos मध्ये देखील Google Lens चा सपोर्ट देण्यात येतो.

हेही वाचा: टाटा मोटर्सच्या वाहनांची जानेवारीत विक्रमी विक्री, या कार ठरल्या टॉपर

दरम्यान गुगलने काही दिवसांपूर्वीच आपल्या मॅपमध्ये एक मोठे फीचर दिले आहे. नवीन अपडेटनंतर, तुम्ही पिन कोडच्या मदतीने आता Google Maps वर पत्ता शोधू शकाल आणि तुमच्या पिन कोडसह पत्ता कोणालाही शेअर करू शकाल. गुगलने म्हटले आहे की, पिन कोडद्वारे सर्च करण्याचा पर्याय भारतात प्रथमच गुगल मॅपमध्ये सुरू करण्यात आला आहे.

गुगलने म्हटले आहे की, पिन कोडद्वारे शोध परिणाम देखील तो पत्ता देईल जो फार कमी लोकांना माहित असेल. 2018 मध्ये प्रथमच, Google मॅप्ससाठी पिन कोड सर्च फीचर देण्यात आले होते, जे सरकारी संस्था आणि स्वयंसेवी संस्थांनी वापरले होते. गुगलने एक महिन्यापूर्वी पायलट प्रोजेक्ट म्हणून हे फीचर आणले आहे, ज्याचा आतापर्यंत 3,00,000 लोकांना फायदा झाला आहे.

हेही वाचा: रेल्वे स्टेशनची नावे पिवळ्या बोर्डवरच का लिहीतात? जाणून घ्या खास कारण

Web Title: Google Reportedly Testing Google Lens Integration With Search On Desktop For Web

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top