esakal | हॅन्ड सॅनिटायझरला उत्तम पर्याय! घड्याळासारखं बांधता येणारं स्वदेशी 'इंडिप्रो'
sakal

बोलून बातमी शोधा

indigr.

 बाहेर पडताना खिशामध्ये हॅन्ड सॅनिटायझर बाळगणे आवश्‍यक झाले आहे. परंतु ते सोबत बाळगणे आणि गरजेच्या वेळेस बाहेर काढणे कसरतीचेच काम होते.

हॅन्ड सॅनिटायझरला उत्तम पर्याय! घड्याळासारखं बांधता येणारं स्वदेशी 'इंडिप्रो'

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

पुणे- बाहेर पडताना खिशामध्ये हॅन्ड सॅनिटायझर बाळगणे आवश्‍यक झाले आहे. परंतु ते सोबत बाळगणे आणि गरजेच्या वेळेस बाहेर काढणे कसरतीचेच काम होते. यावर उपाय म्हणून पुण्यातील इनडिग्री टेक्‍नॉलॉजिस या स्टार्टअपने घड्याळाची जागा घेणारे "इंडिप्रो' हे हॅन्ड सॅनिटायझर विकसित केले आहे.

एमआयटी वर्ल्ड पिस युनिव्हर्सिटीच्या प्रा. शर्मिष्ठा देसाई आणि विद्यार्थी अथर्व बर्वे व विश्वा सिंग यांनी या स्टार्टअपची सुरुवात केली आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकत्र येत सुरू केलेले देशातील हे पहिले स्टार्टअप असेल असा दावा ते करतात. हातात सहज घालता येईल असे इंडिप्रो नावाचे मॉडेल ते गेली सात ते आठ महिने तयार करत होते. त्यामुळे तुम्ही कधीही कुठेही हात सॅनिटाईझ करू शकता. इंडिप्रोच्या उत्पादनासाठी अर्णव पांडे, देवेश भोगरे, शुभ श्रे, श्रीजित कुमार आणि आशिष आतकर या विद्यार्थ्यांचा चमू कार्यरत होता. उत्पादनासाठी ऍडव्हान्डेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कोमारगिरी, अभियंता संतोष जाधव, एमआयटी वर्ल्ड पिस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू डॉ. एन. टी. राव, अधिष्ठाता डॉ. प्रसाद खांडेकर, डॉ मंगेश बेडेकर, अक्षय राठोड यांचे मार्गदर्शन लाभल्याचे प्रा. देसाई सांगतात.

शरद पवारांनी जपले सोलापुरातील सच्चा कार्यकर्त्यासोबतचे नाते 

इंडिप्रोची वैशिष्ट्ये-
- हा कार्ट्रिज सिस्टिम बॅंड असून याची क्षमता 25 मिलीलिटरची आहे.
- त्यामध्ये कमीत कमी 250 स्प्रे होतात.
- कार्ट्रिज कधीही रिफील करू शकतो.
- स्वच्छता कर्मचारी, डॉक्‍टर, परिचारिका, पोलिस, प्रशासन आदींना उपयुक्त
- संपूर्णतः स्वदेशी बनावटीचे, सर्व ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध

loading image