Hero BS6 Xpulse 200T बाजारात दाखल ; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Hero BS6 Xpulse 200T
Hero BS6 Xpulse 200T

सध्याच्या तरुणवर्गात गाड्यांची तुफान क्रेझ आहे. त्यामुळे बाजारात येणाऱ्या प्रत्येक नव्या गाडीविषयी जाणून घेण्यासाठी तरुणवर्ग कायमच उत्सुक असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच तरुणाईची आवडनिवड लक्षात घेता अनेक कंपन्यांनी नव्या गाड्या बाजारात दाखल केल्या आहेत. यात साध्या गाडीपासून ते इलेक्ट्रीक कारपर्यंत अनेक नव्या सोयीसुविधांनी युक्त गाड्या बाजारात उपलब्ध असल्याचं पाहायला मिळतं. यात तरुणवर्गात सध्या बाईक्सची विशेष आवड असल्याचं दिसून येत आहे. यात रॉयलएन्फिल्ड, बेनेली लिओन्सीनो,यामाहा एन मॅक्स १५५ अशा अनेक बाईक्सला तरुणांची पसंती आहे. त्यामध्येच आता हिरो या लोकप्रिय ब्रॅण्डची नवी BS6 Xpulse 200T ही टू-व्हिलर बाजारात दाखल झाली आहे. विशेष म्हणजे या बाईकला तरुणाईकडून पसंती मिळत आहे.

हिरो या कंपनीने शनिवारी त्यांची BS6 Xpulse 200T ही बाईक बाजारात दाखल केली आहे. या बाईकची किंमत १, १२,८००( दिल्ली,एक्स शो रुम) रुपये इतकी आहे.  या बाईकची किंमत BS4 (Xpulse 200 BS4) या मॉडेलपेक्षा १७ हजारांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे BS6 Xpulse 200T ही नव्या दमाची बाईक खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. तसंच या बाईकमध्ये 190.66सीसीचं सिंगल सिलिंडर इंजनद आहे.

काय आहे BS6 Xpulse 200T ची वैशिष्ट्ये?

फाइव्ह-स्पीड ट्रान्समिशनसोबत येणाऱ्या या बाईकमध्ये 17.8  बीएचपी पॉवर आणि 16.15 एनएम टॉर्क जेनरेट करण्याची क्षमता आहे. मात्र. या बाईकचा लूक हा पूर्णपणे BS4 प्रमाणेच आहे. ही नवी बाईक स्पोर्ट्स रेड, पँथर ब्लॅक आणि मॅट्टे शील्ड गोल्ड या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

या बाईकमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, फूल एलइडी हेडलॅम्प, टर्न बाइ टर्न  नेविकेशन आणि ट्रॅव्हल रेडी सस्पेंशन मिळतं. तसंच यात फ्रंट डिस्क 276 एमएम, 130 एमएम रेडियल रियर टायर आणि सेल्फ व किक स्टार्ट फिचर आहे. इतकंच नाही तर यात मल्टी मल्टी प्लेटवेट कल्च, ट्यूबलेस टायर, एलसीडी इंस्ट्र्यूमेंट पॅनल राइडगाइड अॅप आणि 12 V-4Ah  ची बॅटरी आहे. सस्पेंशन सिस्टमसाठी टेलेस्कोपिक आणि 10 स्टेप अॅजस्टेबल मोनोशॉक युनिट फ्रंट आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com