Hero Eddy : हिरो इलेक्ट्रिकने सादर केली इलेक्ट्रिक स्कूटर, पाहा डिटेल्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hero eddy electric scooter

Hero Eddy : हिरो इलेक्ट्रिकने सादर केली इलेक्ट्रिक स्कूटर, पाहा डिटेल्स

हिरो इलेक्ट्रिक (hero electric) ने भारतीय बाजारपेठेत आज म्हणजेच 1 मार्च रोजी त्यांची हिरो एडी (Hero Eddy) इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहे. कंपनी पुढील तिमाहीत लॉन्च करण्याचा विचार करत आहे. ही आगामी इलेक्ट्रिक स्कूटर दररोज कमी अंतराचा प्रवास करतात Dशा ग्राहकांसाठी डिझाइन केली आहे. कंपनीचा उद्देश ग्राहकांना तंत्रज्ञानासह दर्जेदार फीचर्स उपलब्ध करून देणे हा आहे.

फीचर्स काय आहेत?

हिरो एडीमध्ये अनेक दमदार फिचर्स देण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, फाईंड माय बाईक , मोठा बूट स्पेस, हेडलॅम्प आणि रिव्हर्स मोड इत्यादी फीचर्स तुम्हाला हिरो इलेक्ट्रिक मध्ये मिळतील. तसेच पुढील तिमाहीत हे स्कुटर लॉन्च करण्याचा कंपनी विचार करत आहे. कंपनी लॉन्च दरम्यान या ई-स्कूटरची अतिरिक्त फीचर्स आणि किंमती उघड केली जाईल.

कलर ऑप्शन्स

Hero Eddy इलेक्ट्रिक स्कूटर दोन कलर्स पर्यायांसह ऑफर केली आहे, ज्यात पिवळा आणि हलका निळा यांचा समावेश आहे. या वाहनाची खास गोष्ट म्हणजे या गाडीला चालवायला लायसन्सची गरज भासणार नाही आणि रजिस्ट्रेशनची देखील गरज नाही.

हिरो इलेक्ट्रिकचे व्यवस्थापकीय संचालक नवीन मुंजाल म्हणाले, “आम्ही आमचे आगामी उत्पादन Hero Eddy ची घोषणा करताना आनंदी आहोत, ज्यात स्मार्ट फीचर्स आणि स्टायलिश लुक यांचा मेळ आहे. स्कूटरची रचना त्रासमुक्त राइडिंग अनुभव, कार्बन फ्री भविष्यासाठी योगदान देण्याच्या वैयक्तिक प्रयत्नांना लक्षात घेऊन केली आहे. कंपनीचे एमडी म्हणाले की, कंपनीला विश्वास आहे की हिरो एडी आराम आणि सुविधा देताना एक आदर्श पर्याय ठरेल. दरम्यान हिरो इलेक्ट्रिक त्याच्या लुधियाना येथील प्लांटमध्ये त्याच्या आगामी इलेक्ट्रिक स्कूटरचे उत्पादन करण्यात येत आहे. लॉन्च झाल्यानंतर, येथून ही इलेक्ट्रिक स्कूटर देशभरात आणली जाईल.

टॅग्स :AutomobileHero Motorcorp