esakal | तुमचा Aadhaar Card वरील फोटो बदलायचाय? ही आहे अगदी सोपी पध्दत

बोलून बातमी शोधा

तुमचा Aadhaar Card वरील फोटो बदलायचाय? ही आहे अगदी सोपी पध्दत

आपण कितीही चांगला कॅमेरा वापरुन स्वतःचे सुंदर फोटो काढतो पण  एका ठिकाणी मात्र आपला फोटो कधीच चांगला राहत नाही ते म्हणजे आपलं आधार कार्ड. मात्र जर तुम्हाला तो  बदलायाचा असेल  तर काय करावे लागेल याविषयी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. 

तुमचा Aadhaar Card वरील फोटो बदलायचाय? ही आहे अगदी सोपी पध्दत

sakal_logo
By
टीम ईसकाळ

पुणे : आपण कितीही चांगला कॅमेरा वापरुन स्वतःचे सुंदर फोटो काढतो पण  एका ठिकाणी मात्र आपला फोटो कधीच चांगला राहत नाही ते म्हणजे आपलं आधार कार्ड.

मात्र जर तुम्हाला तो  बदलायाचा असेल  तर काय करावे लागेल याविषयी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. 


आधार कार्डचा फोटो कसा बदलायचा

- आधार कार्डमध्ये आपला फोटो बदलण्यासाठी सर्व प्रथम, यूआयडीएआय UIDAI  पोर्टलवर जा आणि तेथून  ‘Aadhaar Card Update Correction’  फॉर्म डाउनलोड करा.

- तुम्हाला विचारण्यात आलेली  सर्व माहिती काळजीपूर्वक भरा 

- UIDAI च्या क्षेत्रीय कार्यालयाच्या नावावर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी एक पत्र लिहा 

- या पत्रासह एक फोटो आणि फॉर्म जोडा आणि तो यूआयडीएआय कार्यालयात पोस्ट करा.

- दोन आठवड्यांत आपणास नवीन फोटोंसह एक नवीन आधार कार्ड मिळेल.


ऑनलाइन फोटो बदलता येत नाही

लक्षात घ्या की आता आधार कार्डमधील फोटो हा ऑनलाइन बदलता येणार नाही. ही प्रक्रिया केवळ पत्ता बदलण्यासाठी उपलब्ध आहे. तुमच्या फोटो बदलण्यासाठी तुम्हाला जवळ असलेल्या नोंदणी केंद्रावर जाऊन पत्राद्वारे अर्ज करावा लागेल.