तुमचा पीसी, लॅपटॉप कसा सेफ ठेवाल?

टीम ई-सकाळ
शनिवार, 14 डिसेंबर 2019

तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर अत्यावश्यक डेटा असेल, तर त्याचा एक्स्टर्नल हार्डडिस्कच्या मदतीने बॅक अप घेऊन ठेवा.

कॉम्प्युटर, लॅपटॉप हा तुमच्या आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. एखाद्या दिवशी तुमचा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप बंद पडला तर, प्रचंड मनस्ताप होतो आणि नेमकं कामाच्या वेळीच असे प्रसंग घडत असतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

ऐनवेळेला आपली पंचाईत होऊ नये म्हणून, आपणच आपल्या कॉम्प्युटर, लॅपटॉपची काळजी घेतली पाहिजे. अर्थात हे काही रॉकेट सायन्स नाही. छोट्या छोट्या टिप्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचा कॉम्प्युटर, लॅपटॉप सुरक्षित ठेवू शकता. 

- सॅमसंगच्या ए91 फोनचा लूक, फिचर्स झाले लिक!

अँटिव्हायरस इन्स्टॉल करा

तुमच्या लॅपटॉपमध्ये व्हायरस येण्याची शक्यता ही इंटरनेटच्या माध्यमातूनच असते. तसेच काही सॉफ्टवेअरच्या माध्यमातूनही तुमच्या लॅपटॉपमध्ये व्हायरस घुसू शकतो. त्यासाठी चांगले अँटिव्हायरस सॉफ्टवेअर इन्सटॉल करून घ्या. 
संशयास्पद फाईल्स डाऊनलोड करू नका.

No photo description available.

तुम्ही ब्राऊझिंग करताना किंवा ई-मेल वापरताना तुम्हाला त्यात एखादी संशयास्पद फाईल किंवा कंटेंट आढळला तर, तो डाऊनलोड करू नका. तुमचा अँडी व्हायरस सगळा संकटांशी लढू शकतो असे नाही. पण, तुम्हीच त्याची काळजी घ्या. 
डेटा बॅकअप घेऊन ठेवा.

- मोबाईलमधील इंटरनेटचा डेटा वाचवा

तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर अत्यावश्यक डेटा असेल, तर त्याचा एक्स्टर्नल हार्डडिस्कच्या मदतीने बॅक अप घेऊन ठेवा. ऐनवेळेला लॅपटॉप बंद पडाल तरी तुमची गैरसोय होणार नाही. त्या डेटाच्या साह्याने तुम्ही दुसरीकडे काम सुरू ठेवू शकला. ऑनलाईन बॅकअप सर्व्हिसेसचा लाभ घ्या. 

Image may contain: indoor

सध्या इंटरनेटवर तुम्हाला डेटा बॅकअपसाठी अनेक ऑनलाईन सर्व्हिसेस उपलब्ध आहे. याच्या साह्याने तुम्ही तुमचा डेटा सुरक्षित ठेवू शकता. त्यासाठी तुमचे थोडे पैसे खर्च होतील. पण, तुम्हाला त्या मुळे हार्डडिस्कदेखील कॅरी करावी लागणार नाही. तुम्ही दुसऱ्या शहरात जाऊनही त्या डेटाच्या साह्याने काम करू शकता.

- खुशखबर! WhatsApp ने आणले नवे फिचर्स

No photo description available.

छोट्या छोट्या गोष्टीही फायदेशीर

तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉवरील रिसायकल बिनमधील किंवा ट्रॅशमधील फाईल्स वेळच्या वेळी डिलिट केल्या पाहिजेत. तुमच्या लॅपटॉपच्या कंट्रोल पॅनलमधील डिस्क क्लिनअप प्रोग्राम रन करा यात कॉम्प्युटरमध्ये तयार होणाऱ्या तात्पुरत्या फाईल्सही स्कॅन होता. त्यानंतर तुमच्या लॅपटॉप, कॉम्प्युटर पुन्हा वेगाने काम करू लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How to keep and protect your PC and laptop safe