WhatsApp Tricks: आता व्हॉट्सअॅप वापरा स्क्रिन टॅप न करता… एवढी सोपी आहे ट्रिक... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WhatsApp Tricks

WhatsApp Tricks: आता व्हॉट्सअॅप वापरा स्क्रिन टॅप न करता… एवढी सोपी आहे ट्रिक...

WhatsApp Tricks: मेटाचे व्हॉट्सअॅप हे जगभरातील २ अब्जाहून अधिक वापरकर्ते असलेले सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप्सपैकी एक आहे. यावरून तुम्ही मेसेज पाठवू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता आणि तुमचे कुटुंब आणि मित्रांसह फोटो/व्हिडिओ शेअर करू शकता. पण अनेकदा आपल्याला एखाद्या मेसेजला उत्तर देण्यासाठी किंवा कॉल करण्यासाठी टाइप करावसं वाटत नाही किंवा आपण कोणत्यातरी कामात असतो आणि फोन ऑपरेट करू शकत नाही… 

काळजी करू नका. एक व्हॉट्सअॅप ट्रिक आहे जी तुम्हाला यावेळी मदत करते. यासाठी तुमच्या स्मार्टफोनचा व्हॉइस असिस्टंट वापरता येतो. पण हे फक्त तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुमचा फोन अनलॉक असेल. तुमचा मोबाईल लॉक असेल तर हे काम करणार नाही. 

पण हे नक्की कसं करायचं?

आधी अॅँड्रॉइड फोन साठीची सेटिंग बघूया… 

तुमचा अँड्रॉइड फोन न हाताळता व्हॉट्सअॅप मेसेज पाठवण्यासाठी तुम्हाला त्यावर गुगल असिस्टंट सुरु करणं गरजेचं आहे. हे करण्यासाठी, सेटिंग्जमध्ये जा आणि अॅप्सवर क्लिक करा. खाली स्क्रोल करा आणि असिस्टंट वर टॅप करा. टॉगल सुरू करा. गुगल असिस्टंट (Google Assistant) सुरू करण्यासाठी गुगल (Google) ला तुम्ही 'Hey Google' म्हणणे गरजेचे आहे. तुम्ही गुगल असिस्टंटला वैयक्तिक किंवा ग्रुप चॅटवर मेसेज पाठवायला सांगू शकता.

iOS वर फोन साठीची सेटिंग बघूया… 

सर्वात आधी तुमच्या iPhone वर सिरी (Siri) सुरू करा असं करण्यासाठी, सेटिंग्जमध्ये जा आणि टॉगलवर “यूज विथ आस्क सिरी” सुरू करा. आता तुम्ही तुमच्या सिरीच्या मदतीने व्हाॅट्सअॅप ऑपरेट करू शकतात.