मृत व्यक्तीच्या पॅन, आधार कार्डचा होऊ शकतो गैरवापर, जाणून घ्या उपाय | PAN- Aadhaar Card | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PAN and Aadhaar Card

मृत व्यक्तीच्या पॅन, आधार कार्डचा होऊ शकतो गैरवापर, जाणून घ्या उपाय

PAN and Aadhaar Card : सध्या आधार कार्ड (Aadhaar Card) आणि पॅन कार्ड (PAN Card) हे अत्यंत महत्त्वाचे झाले आहेत. कोणत्याही सरकारी सुविधांचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. याशिवाय आधार आणि पॅनकार्डचा वापर मुलाच्या शाळेत प्रवेशापासून ते रुग्णालयात दाखल होण्यापर्यंत केला जात आहे. मात्र मृत व्यक्तीच्या आधार कार्ड आणि पॅनकार्डचे शेवटी काय होते? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का, नसेल तर, मृत व्यक्तीच्या आधार आणि पॅनकार्डचे काय करावे ते आज आपण जाणून घेणार आहोत.

मृत व्यक्तीचे आधार येथे जमा करा

मृत व्यक्तिच्या आधार कार्डचा वापर अनेक चुकीच्या कामांमध्ये केला जाऊ शकतो, मात्र आधार कार्डला एक युनिक आयडी आहे, त्यामुळे ते रद्द करता येत नाही, पण तुम्ही ते ब्लॉक करू शकता. आधार कार्ड ब्लॉक करण्यासाठी, तुम्हाला प्रथम आधारच्या अधिकृत वेबसाइट, uidai.gov.in वर जावे लागेल. यानंतर My Aadhaar वर क्लिक करा. यानंतर आधार लॉक आणि अनलॉक वर क्लिक करा. आता तुमच्या समोर Lock UID आणि Unlock UID चा पर्याय उघडेल.

आता UID Lock वर क्लिक करा. यानंतर 12 क्रमांक असलेला आधार कार्ड नंबर आणि तुमचे नाव आणि पिन टाका. त्यानंतर तुमचा सुरक्षा कोड टाका. रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP येईल आणि तुमचा आधार ब्लॉक होईल.

हेही वाचा: Jio एक वर्षाचा प्रीपेड प्लॅन; दररोज मिळेल 2.5GB डेटा आणि बरंच काही

पॅन कार्ड कसे सबमिट करावे

जर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे निधन झाले असेल, तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की ते शक्य तितक्या लवकर डिएक्टिव्हेट करुन घ्या. यासाठी तुम्ही आयकर विभागाशी (IT Dept) संपर्क साधू शकता. खाते निष्क्रिय करण्यापूर्वी दुसऱ्याच्या नावावर हस्तांतरित करा. आयकर विभागाच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही ते डिएक्टिव्हेट करू शकता.

हेही वाचा: Tata घेऊन येतेय स्वस्तात मस्त सीएनजी कार, काय असतील फीचर्स?

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pan card
loading image
go to top