तुमच्या घरातील Wi-Fi सुरक्षित कसे करावे? जाणून घ्या पध्दत

Internet Safety
Internet Safety Google

कोरोना (coronavirus) महामारीच्या संकटामुळे आपल्यापैकी बरेच जण सध्या घरात अडकून पडले आहेत. अनेक जण तर त्यांची कामे देखील वर्क फ्रॉम होम करत आहेत. दरम्यान या काळात आपल्या सगळ्यांचा इंटरनेटचा वापर मात्र कित्येक पटीने वाढला आहे. आपल्या दररोजच्या जीवनात इंटरनेटचे महत्व वाढण्यामागे कोरोना महामारी हे मोठे कारण आहे. पण या वाढत्या इंटरनेटच्या वापरासोबत काही गोष्टींची काळजी घेणे देखील महत्वाचे आहे. इंटरनेटचा सुरक्षित वापर न केल्यास तुमचा डेटा आणि संवेदनशील माहिती चोरी केली जाऊ शकते आणि त्यानंतर ब्लॅकमेल, खंडणी मागणे असे प्रकार देखील होऊ शकतात. याचसाठी तुमच्या होम नेटवर्कच्या सुरक्षिततेबद्दल काळजी घेतली पाहिजे आणि वाय-फाय (Wi-Fi) सुरक्षा वाढविण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय केले पाहिजेत.(how to secure wi-fi home network with airtel secure internet)

बरेच लोक त्यांच्या घराचे नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी वापरत असलेला एकमेव उपाय म्हणजे पासवर्ड सेट अप करणे हा आहे, मात्र संपुर्ण सुरक्षेसाठी हे पुरेसे नाही. तुमचे होम नेटवर्क सुरक्षित नसल्यास तुमची खाजगी माहिती चोरी होण्याचा धोका वाढतो. या सोबतच तुमच्या मुलांची इंटरनेट सुरक्षा, तुमची प्रयाव्हसीही धोक्यात येते. तुम्ही तुमच्या मुलांच्या संरक्षणासाठी पॅरेंट कंट्रोल (Parent Control), अॅप्स (App) आणि ट्रॅकिंग सॉफ्टवेअर (Tracking Software) पर्याय वापरु शकता पण ते करणे वेळखाऊ आणि कंटाळवाणे असू शकते. सोबतच हे करण्यासाठी तुम्हाला काही तांत्रिक गोष्टी माहिती असणे देखील आवश्यक आहे. म्हणूनच आपल्या मुलांना सुरक्षित ठेवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे अडल्ट कंटेंट सोशल आणि गेमिंग या संबंधीचा कंटेट वाय-फाय राउटरपासून ब्लॉक करणे हा आहे.

वायरलेस होम नेटवर्क (Wi-Fi) कसे सुरक्षित करावे

होम नेटवर्कची सुरक्षा अत्यंत महत्वाची बाब आहे. पण बऱ्याच जणांना त्यासाठी आवश्यक गोष्टी करण्यासाठी वेळ मिळत नाही. तर अशा लोकांसाठी बएअरटेलने आपल्या एअरटेल एक्सस्ट्रीम फाइबर वापरकर्त्यांसाठी हे आवश्यक काम सोपे केले आहे. कंपनीने वापरकर्त्यांसाठी एअरटेल सिक्युअर इंटरनेट सेवा सुरू केली आहे जी इंटरनेट वापरताना सुरक्षिततेचा आणखी एक लेयर म्हणून काम करते. वापरकर्त्यांनी निवडलेल्या प्रोफाइलनुसार हे सर्व मालवेयर, संगणक व्हायरस आणि वेबसाइट्स आणि अॅप्सची ट्राफिक ब्लॉक केली जाते. हे ब्लॉकिंग वाय-फाय शी कनेक्ट केलेल्या सर्व डिव्हाइससाठी ब्रॉडबँड पातळीवरील लिंकसाठी लागू होते.

Internet Safety
जॅग्‍वार रेंज रोव्हर वेलार भारतामध्ये ‍दाखल

'सेक्योर इंटरनेट'ची (airtel secure internet) वैशिष्ट्ये

या सिस्टममध्ये आपल्याला प्रोफाईलनुसार निवडलेला कंटेटचा प्रकार आणि त्या प्रोफाइलमध्ये येणार्‍या सर्व वेबसाइट्स आणि अॅप्स ब्लॉक करता येतात.

उपलब्ध चार प्रोफाइल

  • व्हायरस प्रोटेक्शन (Virus Protection)

  • चाईल्ड सेफ्टी (Child Safety)

  • स्टडी मोड (Study Mode)

  • वर्क मोड (Work Mode)

या चार प्रोफइल काही ठराविक प्रकारचा कंटेंट ब्लॉक करतात. उदाहरणार्थ, वर्क मोड ऑन केल्यानंतर 'स्ट्रीमिंग मीडिया' या प्रकारातील सर्व वेबसाईट ब्लॉक करते यामुळे सर्व स्ट्रिमींग साइट आणि ओटीटी प्लॅटफॉर्म ब्लॉक केले जातात. हे फीचर आपण घरून काम करत असताना मदत करते. मुले घरातून शिक्षण घेत आहेत त्यांचे लक्ष ऑनलाईन क्लासकडे ठेवण्यासाठी देखील हे मदत करते. यासाठी यामध्ये शिल्ड नेटवर्क कनेक्शनचा पर्याय दिला आहे. स्टडी मोड हा गेम कॅटेगरी आणि ऑनलाईन गेम्स ब्लॉक करते. यामध्ये वापरकर्ते एकावेळी फक्त एकच प्रोफाइल निवडू शकतात.

Internet Safety
TALI APP : आता तुमच्या मुलाच्या अभ्यासाची चिंता नाही

आपल्याला फक्त एयरटेल थँक्स अॅप इंस्टॉल करावे लागेल त्यानंतर थँक्स पेज वर जा आणि 'सेक्योर इंटरनेट' कार्डवर क्लिक करा. पहिल्या महिन्यातील वर्गणी ( 30 दिवस फ्री ट्रायल) वापरकर्त्यांसाठी फ्री आहे आणि पुढच्या महिन्यापासून बिलात मासिक शुल्क 99 आणि जीएसटी जोडले जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com