सिमकार्डशिवाय फोनमध्ये वापरता येणार तीन नंबर, वाचा काय आहे फिचर

स्मार्टफोन लाँच झाल्यापासून अनेक गोष्टी बदलल्या आहेत.
Sim Card
Sim Cardesakal
Summary

स्मार्टफोन लाँच झाल्यापासून अनेक गोष्टी बदलल्या आहेत.

स्मार्टफोन (smartphone) लाँच झाल्यापासून अनेक गोष्टी बदलल्या आहेत. फोनच्या डिस्प्लेपासून ते बॅटरीपर्यंत बरेच काही बदलले आहे. त्याचप्रमाणे सिम कार्ड (simcard) देखील विकसित केले गेले आहेत आणि हळूहळू आपण ई-सिमकडे देखील वळलो आहोत. अलीकडच्या काळात फोनमध्ये सिमकार्ड वापरण्याची पद्धत मोठ्या प्रमाणात बदलली आहे. अनेक कंपन्या फिजिकल सिमकार्डऐवजी ई-सिमकडे वळत आहेत.

Sim Card
iPhone 15 मध्ये नसेल सिमकार्ड स्लॉट? नेमकं e-SIM म्हणजे काय? वाचा

हळुहळू सॅमसंग, अॅपल आणि गुगल सारख्या कंपन्या फोनचा सिम स्लॉट बदलत आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे लवकरच फिजिकल सिम स्लॉटला अलविदा म्हणता येईल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या केवळ अनुमान आहे. पण आता अँड्रॉइड एक काम करणार आहे. कारण अँड्रॉइडच्या नवीन व्हर्जनमध्ये मल्टिपल इनेबल्ड प्रोफाइल (एमईपी) दिले जाऊ शकतात. हे एक वैशिष्ट्य आहे ज्याद्वारे एका फोनमध्ये तीन नंबर प्ले केले जाऊ शकतात. ते कसे? हे जाणून घेऊयात.

एका अहवालानुसार, Android 13 मध्ये मल्टीपल इनेबल प्रोफाइल (MEP)ची टेस्टिंग केली जात आहे. याच्या मदतीने एकाच ई-सिम कार्डवर अनेक प्रोफाईल प्ले किंवा अॅक्टिव्ह करता येतात. म्हणजेच, जेव्हा मल्टिपल इनेबल्ड प्रोफाइल (MEP) Android 13 मध्ये दिले जाते, तेव्हा याद्वारे तुम्ही एकाच MEP मध्ये दोन टेलिकॉम कंपन्यांचे सिम चालवू शकाल आणि तेही कोणत्याही त्रासाशिवाय. याचा अर्थ तुमच्या फोनमध्ये एक फिजिकल सिम स्लॉट आणि दोन ई-सिम असतील.

Sim Card
तुमच्या आधार कार्ड क्रमांकावर किती जणांनी घेतलंय सिमकार्ड?

ई-सिम म्हणजे काय हे जर तुम्हाला माहीत नसेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की ते एम्बेडेड सबस्क्राइबर आयडेंटिटी मॉड्यूल आहे, जे अक्षरशः कोणत्याही फोनमध्ये काम करते. हे सॉफ्टवेअर आधारित सिम आहे. Android 13 अपडेट स्टेबल व्हर्जनमध्ये जुलै महिन्यात दिला जाऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com