Aura Or Dzire : मायलेज ते फिचर, अफोर्डेबल किंमतीसह बेस्ट कार कुठली? जाणून घ्या एका क्लिकवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aura Or Dzire

Aura Or Dzire : मायलेज ते फिचर, अफोर्डेबल किंमतीसह बेस्ट कार कुठली? जाणून घ्या एका क्लिकवर

Comparisons Of Cars : साउथ कोरियन वाहन निर्मिती कंपनी ह्युंदई मोटर्सने Hyundai AURA च्या फेसलिफ्ट व्हर्जनला नुकतंच लाँच केलंय. या कारमध्ये 3o पेक्षा जास्त सेफ्टी फिचर्स दिले गेले आहे. या मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6,29,000 ठेवली गेली आहे. तेव्हा स्वस्तात मस्त आणि तुमच्या बजेटमध्ये बसणाऱ्या या कारबाबत आणखी जाणून घ्या.

बाजारात हे कलर्स उपलब्ध

बाजारात ही कार व्हाइट पोलर, टायटन ग्रे, टायफून सिल्वर, स्टारी नाइट, टील ब्लू आणि फेयरी रेड या कलर्समध्ये उपलब्ध आहे. बाजारात ही कार मारुती डिझायरला टक्कर देणारी ठरू शकते. तेव्हा तुमच्यासाठी कुठली सेडान बेस्ट ठरेल ते जाणून घेऊयात.

जाणून घ्या पावर आणि परफॉर्मंस

नव्या Huyndai Aura ला थ्री पावर ट्रेन ऑप्शनसह शो करण्यात आलंय.

फिचर्स

तर मारुती डिझायरमध्ये 1.2 लीटर पेट्रोल टँक, तसेच 5 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशनसह, स्मार्ट ऑटो एएमटीसह 1.2 एल टँक पेट्रोल टांसमिशन आणि 1.2 Bi-Fuel 5 मॅन्युअल ट्रांसमिशनसह लाँच करण्यात आलंय. या कारची 1.2 लीटर टँक पेट्रोल इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशनसह 83 PS चा पावर आणि 113.8 Nm चा टॉर्क जनरेट करते. तर 1.2 Bi-Fuel इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशनसह 69 PS चा पावर आणि 95.2 चा टॉर्क जनरेट केलाय. डिझायरच्या सीएनजी व्हॅरिएंटसह केवळ 5 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स दिलाय.

तर Hyundai AURA ने ग्राहकांसाठी हे मॉडल आणखी सुविधांसह लाँच केले आहे. कारच्या फिचर्सना आणखी अॅडवांस केले आहे. यात 8.89cm चा मल्टी इंफॉर्मेशन डिस्पले. फुटवेअर लाइटिंग, वायरलेस फोन चार्जर, यूएसबी चार्जर, ऑटोमॅटिक हँडलँप, स्मार्टफोन कनेक्टिव्हीसह 20.25 सेमी टचस्क्रीन डिस्प्ले ऑडिओ, अॅप्पल कारप्ले, अँड्रॉइड ऑटो, ब्लूटूथ कनेक्टिव्हीटी, ऑडिओ आणि ब्लूटूथसाठी स्टीयरींग व्हीलवर लागलेलं कंट्रोलर, क्रूज कंट्रोल सिस्टिम यांसारखे फिचर्स दिलेले आहेत.

सेफ्टी फिचर्सही जबरदस्त

नव्या Hyundai AURA मध्ये 6 एयरबॅग ऑप्शनसह 4 एअरबॅग स्टँडर्ड दिलेले आहेत. कंपनीच्या मते, या वाहनामध्ये 30 पेक्षा जास्त सेफ्टी फिचर्स दिलेले आहेत. त्यात ESC, VSM आणि व्हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोलसारखे सेफ्टी फिचर्सही दिले आहेत. (Automobile)

हेही वाचा: Maruti Dzire बनली देशातील नंबर 1 सेडान, Tata अन् Hyundaiला ही टाकलं मागे, किंमतही स्वस्त

तर मारुती डिझायरमध्ये ड्यूल फ्रंट एअरबॅग. आईएसओफिक्स चाइल्ड सीट अँकर आणि रियर पार्किंग सेंसर यांसारखे फिचर्स सगळ्याच व्हॅरिएंटमध्ये स्टँडर्ड दिले गेले आहेत. याच्या एएमटी व्हॅरिएंटमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आणि व्हिल होल्ड असिस्टसारखे फिचर्स दिले गेले आहेत. तर टॉप मॉडेलमध्ये व्ह्यू कॅमेरा आणि रियर डिऑगर सारखे फिचर दिले गेले आहेत. सेफ्टीसाठी दिल्या गेलेल्या एअरबॅगसाठी Hyundai AURA बेस्ट ठरते. (Car)

टॅग्स :automarutihyundai