Hyundai i20 Price Hike : ह्युंदाईची i20 पुन्हा महागली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hyundai i20 Price Hike

Hyundai i20 Price Hike : ह्युंदाईची i20 पुन्हा महागली

Hyundai i20 Price Hike : Hyundai ने पुन्हा एकदा आपली लोकप्रिय हॅचबॅक i20 च्या किंमतीत वाढ केली आहे. कंपनीने गेल्या महिन्यात दुसऱ्यांदा Hyundai i20 च्या किंमतीत वाढ केली आहे.

कोरियाची कार निर्माता कंपनीने या महिन्याच्या सुरुवातीला किंमतीत वाढ केल्यानंतर पुन्हा एकदा किंमतीत वाढ केली आहे. जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर जवळपास ६ टक्के किंमतीच्या वाढी सोबत कमीत कमी ७.४६ लाख रुपये (एक्स शोरूम) खर्च करावे लागतील.

नवीन किंमतीच्या लिस्टनुसार, किंमतीत वाढ केल्यानंतर Magna (मॅग्ना), Sportz (स्पोर्ट्ज) आणि Asta (एस्टा) ट्रिम मध्ये ९ व्हेरियंट्सच्या किंमतीवर परिणाम पडणार आहे. सर्वात जास्त किंमत मॅग्मा मॅन्युअल व्हेरियंटची वाढवली गेली आहे. जी जवळपास ४३ हजार रुपये महाग झाली आहे.

मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक सोबत ड्युअल टोन व्हर्जन मध्ये आलेले स्पोर्ट्स व्हेरियंटच्या किंमतीत सर्वात कमी १४ हजार ६०० रुपयाची आणि १६ हजार ४०० रुपयाची वाढ करण्यात आली आहे. एस्टा आणि एस्टा (ओ) व्हेरियंटच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे.

या महिन्याच्या सुरुवातीत Hyundai ने i20 व्हेरियंट्सच्या किंमतीत १५ हजार ९०० रुपये पर्यंत वाढ केली होती. हा निर्णय कार निर्माताकडून १ एप्रिल पासून नवीन नियम लागू करण्यात आल्यानंतर आपल्या लाइनअपला अपडेट केल्यानंतर घेतला गेला होता. Hyundai ने i20 डिझेल व्हेरियंटला हटवले होते. आता फक्त पेट्रोल व्हेरियंटला ठेवले होते. i20 पेट्रोल व्हेरियंटला नुकतेच बीएस ६ फेज २ इंजिन सोबत अपडेट करण्यात आले होते.

Hyundai i20 मध्ये 1.2-लीटर नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल आणि 1.0-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन मिळते. हे इंजिन आता बीएस-6 फेज 2 आणि आरडीई नॉर्म्स नुसार आहे. १.२ लीटर यूनिट ८२ बीएचपीचे पॉवर आणि ११५ एनएमचे पीक टॉर्क जनरेट करते.

तर १.० लीटर टर्बोचार्ज्ड यूनिट ११८ बीएचपीचे पॉवर आणि १७२ एनएमचे पीक टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशन ऑप्शनमध्ये १.२ लीटर व्हर्जन वर ५ स्पीड मॅन्युअल आणि सीव्हीटी आणि टर्बो पेट्रोल वर ७ स्पीड डीसीटीचा समावेश आहे.