प्रायव्हसी पॉलिसी नसल्यास प्ले स्टोअरवरून ऍप हद्दपार

वृत्तसंस्था
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली: तुमच्या फोनमधील वैयक्तिक अथवा संवेदनशील माहिती वापरण्याची परवानगी मागणारे; परंतु योग्य ती प्रायव्हसी पॉलिसी (गोपनीयता धोरण) नसणारे ऍप आता हद्दपार होणार आहेत. गुगलने हा निर्णय घेतला असून, यापुढे गुगल प्ले स्टोअरवर योग्य ती प्रायव्हसी पॉलिसी असणारी ऍपच राहतील, असे सांगण्यात आले आहे.

गुगल याबाबतची प्रक्रिया लवकरच सुरू करणार असून, नियमांची पूर्तता करण्यास कमी पडणारी ऍप्स प्ले स्टोअरच्या यादीतून वगळली जाणार आहेत. यामुळे प्रत्येक ऍपला प्रायव्हसी पॉलिसी आवश्‍यक राहणार असून, यामध्ये डेव्हलपर युजर्सची कोणती माहिती वापरतो आणि ती कोणत्या मार्गे घेतली जाते, याचाही विचार होणार आहे.

सद्यःस्थितीला तुम्ही कोणतेही ऍप डाउनलोड केल्यानंतर तुमचे मेसेजस, कॉन्टॅक्‍ट आणि फोटोजचा ऍक्‍सेस घेतला जातो; परंतु याचा उपयोग करून तुमच्या वैयक्तिक सुरक्षेला हानी पोहोचू नये, यासाठी ही नवी नियमावली आणण्यात आली असून, याद्वारे इंटरनेटवरील सुरक्षा वाढणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title: If the privacy policy of exile Play Store app