esakal | ...तर WhatsApp करणार Block
sakal

बोलून बातमी शोधा

...तर WhatsApp करणार Block

सोशल मीडियापैकी एक असलेल्या WhatsApp चा वापर जगभरात झपाट्याने वाढत आहे. आपल्या WhatsApp युजर्सच्या सुरक्षेच्या दृष्टीने पावलेही उचलली जात आहेत.

...तर WhatsApp करणार Block

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सोशल मीडियापैकी एक असलेल्या WhatsApp चा वापर जगभरात झपाट्याने वाढत आहे. आपल्या WhatsApp युजर्सच्या सुरक्षेच्या दृष्टीने पावलेही उचलली जात आहेत. मात्र, आता WhatsApp कडून युजर्सला ब्लॉक केले जाऊ शकते. याबाबतची माहितीच कंपनीकडून देण्यात आली आहे.

WhatsApp चे थर्ड पार्टी अॅप असलेले GB WhatsApp आणि WhatsApp Plus चा वापर केल्यास कंपनीकडून युजर्सला तात्पुरत्या (Temporary) स्वरुपात बॅन केले जाऊ शकते. त्यामुळे युजर्सने याबाबतची खबरदारी घेणे गरजेचे आहे. याची सविस्तर माहिती WhatsApp च्या FAQ मध्ये देण्यात आली आहे. तसेच Block केल्यानंतरच आपण Unsupported Version चा वापर करत असल्याचे स्पष्ट होईल.  

...तर येईल Temporarily Banned असा मेसेज

WhatsApp युजर्सकडून एकाच वेळी दोनपैकी एका अॅपचा वापर केला गेल्यास युजर्सला Temporarily Banned असा मेसेज मिळेल.

loading image
go to top